या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ४ था. एप्रिल १८९९. मुकुंद माधव छंद घेउनी वंदुनि मायानटा । उसको उभारूं प्रेमाचा बाहुटा ॥ चाल. या धरा साजणी प्रेमभरानें फरा। जार करूं साज आज यदुराज गाउं साजरा । स्तव॒ वाजत गाजत विमला कमलावरा । आनकदुंदुभि नंदयशोदानंदकंद लाभला । साजणी तोच सखा आपला ॥ पुजू च०॥ अंगबळाने संगर मांडी भुजंगबल भंगुनी । स्तविती वृंदारक सुरमुनी ॥ अहोयामिनी धनी मुकुंदा विनीत गजगामिनी । व जया त्या भुलल्या व्रजकामिनी ॥ कुंजवनी जो कंजनयन करि मुरलीमंजुध्वनी। कि घेऊं या तोच मनीं पूजुनी ॥ चाल. करुं शब्दसुमांचा हार फार चांगला । वरि सन्मति चंदनगंध सुटूं लागला। की क्षमा शांति या वाहुनि तुलसीदला। क्षेमसुखें कर्पूर लाविला प्रेमगुणें रंगला। भक्तिचा नैवेद्यहि अर्पिला ॥ पुजू चला०॥ मनोमंदिरी विचित्र सुंदर चित्रे बहु लेखिलीं। हरीची मूर्ति त्यांत रेखिली ॥ वरी रम्य भरजरी झालरी कल्पलता लाविली । पर शोभा शब्दालंकृत भली ॥ फुलें खस्तिकें खुले विलेपित विचाररंगावली । ___ अंगणी रम्य दिसों लागली ॥ चाल. लावू चला हरियशोदीप चहुंकडे । EिNT तत्पदी ओतुं या प्रेमरसाचे घडे । TO झडति दणण हरिनामाचे चौघडे ।