या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२४६ केरळकोकिळ, पुस्तक १३ वें. खरे आणि खोटें. श्लोक. (भुजंगप्रयात.) फिरे सूर्य हे पाहुनी नित्य डोळां 5 सदां चालतो भूमिचा हाच गोळा । असे सांगती जाणते मोठमोठे जगी कोण जाणे खरे आणि खोटें ॥ १ ॥ धरा वर्तुलाकार तीतें न शीव दुजा बोलतो प्राणि आहे सजीव । दिसे सारखी शब्द काढा न ओठे जगी कोण जाणे खरे आणि खोटें ॥ २ ॥ वरी पांच भर्ते धरी चित्त कर्णी तरी ती सती द्रौपदी व्यास वर्णी जिच नांव घेतां पते पण्य मोसा जगी कोण जाणे खरे आणि खोटें ॥३॥ असंख्यात नारी परस्त्रीस भोगी ना महा ब्रह्मचारी तरी कृष्ण योगी। नये फोडितां गुप्ततेचे लखोटे जगी कोण जाणे खरे आणि खोटें ॥ ४ ॥ गळा कापुनी भोगितो चैन खाशी दुजा दीन सत्वस्थ तो जाय फांशीं । प्रभूचा तिथे राहतो न्याय कोठे जगी कोण जाणे खरे आणि खोटें ॥५॥ करी एक पत्नीप्रती मारहाण चिनी ठेविती बायकोला गहाण । विवाहाविना नाय काय तोटे जगी कोण जाणे खरे आणि खोटें ॥६॥