या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ४ था. एप्रिल १८९९. तंत्र्याच्या, पूर्वोक्त जडशृंखळेंत एका दुव्याची आणखी भर घालून अधिक जखडून मात्र ठेवतों. ह्याकरितां दुसऱ्या कडून आपणावर प्रयोग करण्यास आपण किती मोकळीक देतो, ह्याबद्दल सावधगिरी ठेवा. तुह्मी न कळत दुसऱ्याचे केवढे नुकसान करता हैं लक्ष्यांत आणा. कोणी कोणी एखादे वेळी, रोग्याच्या मनाचा कल निराळ्याच दिशांकडे वळवून, एखाद्याचे पुष्कळ हित करतात, ही गोष्ट खरी आहे. पण त्याच वेळी ते इतर लक्षावधि लोकांचा नाश करतात. कारण, त्याच्या प्रयोगाचा अंमल सभोंवतीं पसरतो, तो त्यास कळत नाही. परंतु त्यामुळे तो रोग, ती कृत्रिम निद्रावस्था व निचेष्ट स्थिति इतर स्त्रीपुरुषांमध्ये उत्पन्न होते. आणि अखेर ती त्यांस ज्ञानशून्य करून सोडते. ह्मणून जे जे कोणी दुसऱ्याला निमूटपणे श्रद्धा ठेवावयास सांगतात, अथवा मनुष्यजातीला मोहनी घालून त्याच्या इच्छेवर आपला अंमल बसवून तीस आपल्या ताब्यांत आणतात, त्यांचा हेतु जरी तसा नसला, तरी ते मनुष्यजातीचे शत्रु होत. ह्याकरितां आपली स्वतःची मनेंच कामास लावाः शरीराला आणि मनाला आपले आपणच ताब्यांत घ्या; तुह्मी व्याधिग्रस्त स्थितीमध्ये आहां तोपर्यंत अन्य इच्छा लागू पडावयाची नाही हे ध्यानात ठेवा. आणि अंधन्यायाने तुह्मांस जो कोणी श्रद्धा ठेवावयास सांगेल, त्याचे काडीभरही ऐकू नका. मग तो थोर असो की चांगला असो. नाचणारे, उडणारे, आणि ओरड करणारे पंथ जगभर झालेले आहेत. ते नाचून, बागडून धर्मोपदेश करूं लागले झणजे सांसर्गिक रोगाप्रमाणे फैलावत ते सुद्धा ह्याच सदराखाली येतात. ते प्रसंगानुसार कोमल मनांच्या पुरुषांवर थोडीशी सत्ता चालवितात. आणि अरेरे! तीच वाढवून साऱ्या जातीच्या जाती धुळीस मिळवून सोडतात. होय; अशा रोगट, विकृत, व उसन्या सत्तेने खरोखर चांगले होण्याचे एका बाजूस राहून, ती व्यक्तीला किंवा सान्या जातीला पतित करण्यास मात्र यथास्थित कारणभूत होते. अशा मनसोक्तपणाने मनुष्यमात्राचे किती नुकसान होते, ह्याच्या विचारांत एखाद्याचे अंतःकरण गढून गेले, तर त्याची गणना धर्मवेड्यांत होते. त्यांना थोडेंच माहित असते की, आपल्या प्रयोगाने, आपल्या गाण्याने, आपल्या प्रार्थनेने ज्या ज्या म ११