या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ४ था. एप्रिल १८९९. माजते. ही मद्याची तार चढलेली आहे तोच ज्यांच्या इच्छा परिपूर्ण होतात, त्यांच्याशी मत्सर हा विंचू चावतो. आणि सरते शेवटी गर्वरूप समंध मनाची गचांडी धरून मोठा काय तो मीच असा अवसर आणतो. अशा मनाला आवरून धरणे, हे किती दुर्घट! मामला ___ तर त्याला पहिली तोड ही की, आपण थोडा वेळ स्वस्थ बसून त्या मनाला हवे तिकडे धावू द्यावें. मन साऱ्या दिवस उसळ्या घेत असते. ते त्या हिकडे उड्या मारणाऱ्या माकडाप्रमाणे आहे. त्या माकडाला मारवतील तितक्या उड्या मारूं द्या. आपण स्वस्थ बसून मजा मात्र पहावी. ज्ञान ही एक शक्ति आहे अशी ह्मण आहे. आणि ती खरी आहे. मन काय करीत आहे तें तुह्मांस कळे तोपर्यंत ते तुमच्या ताब्यांत यावयाचे नाही. त्याचा लगाम खूपसा सैल सोडून द्या; त्याला जितके काही वाईट दुष्ट विचार मनांत आणावयाचे असतील, तितके आणं द्या. 'एकूण, असले असले विचार सुद्धा आपल्या मनांत येतात अं!' असें ह्मणून तुह्मी आश्चर्यचकित व्हाल. पण प्रत्येक दिवशीं मनाच्या लहरींचा जोर कमी कमी होऊन, दिवसेंदिवस अधिक अधिक शांत किंवा स्थिर होत चालल्याचे तुमच्या दृष्टोत्पत्तीस येईल. प्रथम प्रथम कांहीं कांहीं महिने तुह्मांस असे आढळून येईल की, मनामध्ये एक हजार विचार येतात; नंतर असे आढळेल की, ते कमी कमी होत सातशेच येऊ लागतात; त्याला आणखी काही महिने लोटले, ह्मणजे त्याहूनही कमी होत होत, अखेर मुळीच काही येईनासे होऊन मन अगदी हुकमांत वागू लागते. तरी आपण आपला अभ्यास धीरे धीरे दररोज चालविलाच पाहिजे. वाफेचा लोंढा येऊन आदळला, की एंजिनाने जशी धाव घेतली पाहिजे त्याचप्रमाणे आमच्यापुढे पदार्थ आले की, त्यांचे ज्ञान आह्मांस झाले पाहिजे. ह्याकरितां मनुष्याने आपण कांही यंत्र नव्हे-कळसूत्र नव्हे, असे सिद्ध करून दिले पाहिजे. आपण कोणाच्याच ताब्यांतले नाही अशाबद्दल प्रमाणे दाखवून दिली पाहिजेत. अशा प्रकारे मनाला आपल्या ताब्यांत ठेवणे, त्याला आपणहून कोणत्या ठिकाणी जाण्यास परवानगी न देणे हाच प्रत्याहार होय. त्याचा अभ्यास कसा करावा ? तें पुष्कळ दिवसांचे काम आहे. एका