या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ४ था. एप्रिल १८९९. तीही चांगली होते. खर मधुर होणे हे सर्व लक्षणांत पहिले लक्षण आहे. नंतर आवाजही सुंदर उत्पन्न होतो. आवाजांतील दोष पालटून जातात. प्रथम जे जे फेरफार होतात, त्यांपैकी काही लक्षणे ही आहेत. जे झपाट्याने अभ्यास करितात, त्यांच्यामध्ये दुसरीही पुष्कळ लक्षणे उत्पन्न होतात. कधी कधी दूर अंतरावर घंटानादांचा गजर सुरू असून, तो कानावर येऊन आदळतो आहे, व त्याचा, सारखा वर घुमत आहे असे वाटेल. कधी काही पदार्थ दिसतात. प्रकाशाचे ठिपके तरंगत असलेले दिसून ते मोठे होत जात आहेत असे वाटते. असे असे प्रकार होऊ लागले झणजे तुमचा अभ्यास झपाट्याने चालत आहे असे समजा. ज्यांना योगी होण्याची आणि झपाट्याने अभ्यास करण्याची इच्छा असेल, त्याने प्रथमतः आहाराबद्दलही थोडीशी काळजी घेतली पाहिजे. ज्यांना अतिशय अभ्यास व्हावयाला पाहिजे असेल, ते जर नुसत्या दुधावर आणि राजगिऱ्यासारख्या हलक्या धान्यावर किंवा कंदमूलांवरच काही महिने निर्वाह करतील, तर पुष्कळ फायदा होईल. परंतु ज्यांना आपला कामधंदा सांभाळून दररोज थोडथोडा अभ्यास करावयाचा आहे, त्यांनी पाहिजे ते खाल्ले तरी चिंता नाही, मात्र तें अधिक खातां कामा नये. से पण ह्याहून लौकर ज्यांना योगी होणे असेल, आणि झपाट्याने अभ्यास करणे असेल, त्यांनी मात्र आपल्या आहारामध्ये नियमितपणा राखणे अतिशय अवश्य आहे. इंद्रियांची क्रिया अतिशय सूक्ष्म सूक्ष्म होत जात असते. त्यामुळे प्रथम प्रथम अगदी क्षुल्लक गोष्टीनंही तुमच्या प्रकृतींत फेरफार झाल्याचे दिसून येईल. तुमचा पुरता अंमल बसेपर्यंत अन्नाचा एक घासही कमी किंवा जास्ती झाला तरी तो तुमच्या सान्या शरिरांत गडबड करून सोडील. पण पूर्ण झाल्यावर मग तुमी काय पाहिजे तें खाल्ले तरी चालेल. तुझी मनाची एकाग्रता करण्यास प्रारंभ केलात की, प्रथम प्रथम एखादी टांचणी पडली, तरी तुमच्या मेंदूमध्ये मेघगर्जनेचा गडगडाट झाला असे वाटेल. इंद्रिये सूक्ष्म होत जातात, आणि त्यामुळे त्यांच्यापासून मिळणारे ज्ञानही सूक्ष्म होतें. आझांला ज्यांतून पार पडावयाचे, त्यांतील ह्या पायऱ्या आहेत. त्यांचा जो पिच्छा पुरवील, त्यालाच जय मिळेल. वादविवाद आणि हमरी