या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केरळकोकिळ, पुस्तक १३ वें. तुमरी सोडून द्या. वायफळ वाग्जाळांत आणि शुष्क कोटिक्रमांत कांहीं अर्थ आहे काय ? तेणेकरून मनाचे स्वास्थ्य मोडून ते चलबिचल मात्र होते. ह्या गोष्टी करावयाच्या आहेत. त्या बोलून होतील काय ? ह्याकरितां वायफळ बोलणं सोडून द्यावें. ज्या ज्या पुरुषांनी अनुभव घेऊन पुस्तकें लिहिलेली असतील, त्यांची त्यांचीच पुस्तके वाचावीत. मोत्यांच्या शिंपल्यासारखे व्हावें. हे नीट मनांत भरवून देण्याला हिंदुस्थानांतील एक आख्यायिका मोठी छान आहे. खाती नक्षत्र लागल्यानंतर पाऊस लागून त्याचा एक थेंब जर शिंपल्यांत पडला, तर त्या थेंबाचें मोती बनते. हे शिंपीतील प्राण्यांस माहित असते. ह्मणून तें नक्षत्र लागले की, ते समुद्राच्या सपाटीवर येतात, आणि त्या मूल्यवान् पर्जन्याचे थेंब झेलण्यासाठी टपून बसतात. त्याचा एक थेब शिपीमध्ये पडला, की तो प्राणी आपले शिंपले मिटतो आणि समुद्रात बुडी मारून तळाशी जाऊन बसतो. नंतर त्या ठिकाणी त्या थवाच हळूहळू मोती बनते. आपणही तसेंच व्हावें. प्रथम ऐकावे; मग विचार करावा; नंतर सारा गोंधळ एका बाजूस सारून, मनाला विकारापासून पराङ्मुख करून त्यांतील सत्यशोधनाकडेच आपला वृत्ति अर्पण करावी. केवळ अपूर्वता पाहूनच एखादी कल्पना याची, आणि तिच्याहून दुसरी एखादी नवी कल्पना आढळला पहिली टाकून द्यावयाची; अशा रीतीने आपल्या उत्साहशक्ताला । भिन्न करणे हे फार भयंकर आहे. एकाच गोष्टीचा खोकार आणि तिच्याच पाठीस लागून तिचा शेवट काय होतो पहावा. तिचा परिणाम समजेपर्यंत तिला सोडूं नये. एखाद्या कल्पनेमध्येच. जा वडा होतो तद्रप बनतो, त्यालाच तिचा शोध लागतो-तिच्याताल र कळते. इकडे कुरतड, तिकडे कुरतड असे जे करणारे आहेत, त्यांच्या हाती काहीच लागावयाचें नाहीं. ते आपल्या ज्ञानतंतूना क्षणमात्र खेळवितील, पण त्यांची परिसमाप्तिही तेथेंच. ते मायच्या हातांतले गुलाम होऊन राहतील, आणि इंद्रियांपलीकडे त्यांच्या हाता कांहीं चालावयाचे नाही. खरोखर ज्याला योगी ह्मणून व्हावयाचे आहे. त्याने ज्या त्या गोष्टीला कुरतडण्याचे सार एकदम सोडून दिले पाहिजे. एकच कल्पना पहिली टाकून फार भयंकर आतिचा शेवट का