या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ४ था. एप्रिल १८९९. ८७ घ्यावी. तीच कल्पना जीव की प्राण मानावी, ध्यानी, मनी, खानी तीच असावी; तिच्याविषयींच विचार करावा; आणि तिच्यावरच निर्वाह चालवावा. तुमचा मेंदू, तुमचे शरीर, तुमचे स्नायू, तुमचे ज्ञानतंतु, तुमच्या शरिराचा प्रत्येक भाग त्याच कल्पनेने भरलेला असावा. दुसऱ्या कोणत्याही कल्पना असल्या तरी त्या बाहेर टाकून द्याव्यात. सिद्धीचा मार्ग हाच; ह्याच मार्गाला अनुसरून महद्विभूति निपजल्या. बाकी सारी शाद्धिक यंत्रे होत. आपणांला जर खरोखर आपलें व दुसऱ्यांचे कल्याण करणे असेल तर, आपणांस अधिक खोलांत शिरले पाहिजे. त्यांतील पहिली पायरी ही की मनाला ढळू देतां कामा नये, किंवा ज्यांच्या कल्पनेने मनाची चलबिचल होईल, अशा मनुष्यांचा सहवासही करता कामा नये. आपणा सर्वांस माहीतच आहे की, कित्येक स्थळे, कित्यक भक्ष्य, ह्यांच्या योगाने आपली वृत्ति फिरते. ह्याकरितां ती वज्य करावीत. आणखी ज्याला अति उच्च स्थानापर्यंत पल्ला गांठावयाचा असेल त्याने सारा सांसर्गच सोडून द्यावा. मग तो चांगल्याचा असा का वाईटाचा असो. झटून अभ्यास करा; मग त्यामध्ये प्राण जावो की राहो त्याची पर्वा बाळगू नका. हे साध्य होईल किंवा नाहीं ह्याचा कांहीं एक विचार न करितां तद्रूप होऊन अभ्यास करा. तुमच्या आंगांत पुरेशी हिंमत असली, तर सहा महिन्यांत तुझी उत्कृष्ट योगी बनाल. परंतु इतर जे कोणी हळहळू अभ्यास करणारे आहेत–प्रत्येक गोष्ट थोडथोडी अमलांत आणणारे आहेत. त्यांच्याने अधिक योग्यतेस येववणार नाही. उगाच अभ्यास करावयाचा ह्मणून करावयाचा, असे करण्यांत कांही अर्थ नाही. जे पूर्ण तामसवृत्तीचे-अडाणी व आळशी आहेत-ज्यांची मने एका गोष्टीवर कधी ठरावयाची ह्मणून नाहींतचजे केवळ आपल्याला काही तरी करमणूक ह्मणूनच त्यांची उपासना करतात, त्यांना धर्म आणि शास्त्र ही केवळ करमणूकच आहे. ते लोक धर्म ही एक करमणूक आहे असे समजूनच त्याच्याकडे येतात, आणि त्यांतील करमणुकीचा जो थोडासा अंश असतो, तेवढाच ग्रहण करतात. असले लोक आरंभशूर होत. ते भाषण ऐकतात; चांगला विचार करतात; आणि मग घरी गेले की त्यांतले सारे विसरून जातात. सिद्धी मिळवावयाची, तर बलवत्तर इच्छा; आणि निस्सीम धैर्य हा