या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२४७ अंक ११ वा. नोवेंबर १८९८. मुसल्मान पत्नीस झांकून ठेवी युरोपामध्ये बायको हीच देवी । धरोनी फिरे जोडपे हात बोटें जगी कोण जाणे खरे आणि खोटें ॥ ७ ॥ पती सांगतो हेच माझें कलत्र पुढे रांगतो हाहि माझाचि पुत्र । तदा जारिणीच्या मनीं हास्य लोटे जगी कोण जाणे खरे आणि खोटें ॥८॥ क्षणार्धामधे होतसे रंक राव नको युद्ध लागे चमूचे न नांव । रिकामी सदा कष्ठुनी कैक पोटें जगी कोण जाणे खरे आणि खोटें ॥ ९ ॥ स्तुती गाउनी मानिती एक धन्य तया बोलती पातकी नीच अन्य । तुकारामही गायसा खाय सोटे जगी कोण जाणे खरे आणि खोटें ॥ १० ॥ करी वैद्यही औषधे यत्न कोटी परी शेवटीं मृत्युच्या जाय भेटी ॥ वनी वांचतो ज्यास पाणी न घोटे जगी कोण जाणे खरे आणि खोटें ॥ ११ ॥ जगी गाजती तत्त्ववेत्ते सुविद्य जना बोधिती प्राशिती तेचि मद्य । बरे तेच ज्यांचे बुडाले न घोटे जगी कोण जाणे खरे आणि खोटें ॥ १२ ॥ कला शास्त्र सिद्धांत जे सर्व "पास" कसे तेच होतात दासानुदास ।