या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ४ था. एप्रिल १८९९. आली, आणि तिने त्याचे मुख कुरवाळून त्यास कडेवर घेतले. त्याचप्रमाणे हे मनुष्या! तूं आपल्या जगज्जननीला-आदिमातेला विसरला आहेस, आणि जगांतील पोकळ अभिमानांत गुंतला आहेस. तो जर फेंकून देशील, आणि आपल्या आईकडे-जगन्मातेकडे-रडत जाशील, तर ती धावत येऊन तुलाही कडेवर घेईल. १५ आझांस ओळखता येण्यासारखी ईश्वरास हजारों नांवे व हजारों स्वरूपें आहेत. ज्या नांवाने आणि ज्या स्वरूपाने तुझांस त्याला हाक मारण्याची इच्छा असेल, त्याच स्वरूपांत आणि त्याच नांवांत तुझाला त्याचे दर्शन होईल. १६ परमेश्वर जर सर्वव्यापी आहे, तर तो कां दृष्टीस पडत नाही ? बाणा एखाद्या तळ्याच्या काठावर इतकें रान व शेवाळ माजलेली असते, की तुही त्यांत मुळी पाणी नाहींच असें ह्मणाल. तुह्मांला त्यांतले पाणी पहाणे असेल, तर पाण्यावर तरंगत असलेली शेवाळ, एका बाजूस सारली पाहिजे. तुमच्या डोळ्यांवर मायेचे पटल आले असल्यामुळे परमेश्वर दृष्टीस पडत नाही असें तुझा ह्मणतो. त्याचे दर्शन घेण्याची जर तुझांला इच्छा असेल, तर तुमच्या डोळ्यांवरचे तेवढे मायेचें पटल काढून टाका झणजे झाले. १७ जगज्जननीचें, आदिमातेचें, दर्शन तरी आझांस कां घडत नाही ? ती थार कुलांत जन्मलेली आहे. ह्मणून मराठमोळ्यांतील बायकांप्रमाणेच तीही पडद्याच्या आड बसूनच आपला सारा कारभार चालविते. तिला सारे दिसतात, पण ती मात्र कोणाला दिसत नाही. तिची लाडकी मुले आहेत, तेवढी मात्र, तिच्या पुढचा मायेचा पडदा बाजूला सारून तिच्या जवळ जातात, आणि तिला पहातात. १८ मनुष्य हा उशांच्या थैल्यांसारखा आहे. एका थैलीचा रंग तांबडा असतो; दुसरीचा निळा असतो; तर तिसरीचा काळा असतो. परंतु साऱ्या थै. ल्यांत भरलेला कापूस एकच. तशीच गोष्ट मनुष्यांची आहे. एक मनुष्य सुदर असतो; दुसरा काळा असतो; तिसरा सात्विक असतो; चवथा दुष्ट असतो. पण त्या सर्वांमध्ये वास्तव्य करणारा अंतरात्मा एकच आहे. आरब लोकांचा लग्नसमारंभ. निरनिराळ्या देशांत लग्नाच्या निरनिराळ्या तन्हा असतात. तथापि त्यांतही रानटी लोक व सुधारलेले लोक ह्यांत महदंतर असतें. सुधारलेल्या लोकांतील लग्ने बरीच भिन्न भिन्न असतात खरी, तथापि रानटी लोकांच्या लग्नपद्धतींत विल. क्षणपणा विशेष. त्यांच्या वेड्याविद्रया चाली ऐकून, मनास बरीच करमणूक होते. १२