या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केरळकोकिळ, पुस्तक १३ वें. आरबी लोक हे रानटीच होत, तेव्हां त्यांच्यांतील समारंभ वाचकांच्या मनोरंजनास थोडासा तरी साधनीभूत होईल, अतएव ती माहिती आज द्यावयाची आहे. 1% प्रथमतः हे सांगावयास पाहिजे की, आरबी लोक एका मकाणावर मुळीच रहात नाही. त्यामुळे त्यांस घरदार मुळीच नाही. त्यामुळे त्यांचा ज्या ठिकाणी मुक्काम होईल, त्या ठिकाणी त्यांस तंबू ठोकून रहावे लागते. त्यांस उंट, घोडे, मेंढरें, बकरी, वगैरे जनावरें नेहमीं पाळावी लागतात. त्यांच्यावरच त्यांची सर्व मदार, हेच त्यांचे सर्व धन, इतकें सांगितले झणजे, पुढील माहिती लक्षांत येण्यास बरेंच साधन होईल. बरेच आरब लोक एकपत्नीव्रताने राहातात, परंतु जेव्हां एकाद्या पुरुषाला एकाद्या मुलीशी लग्नसंबंध जोडावासा वाटतो, तेव्हां तो आपल्या घराण्याताल, कांहीं इष्टमित्रांला मुलीच्या बापाकडे पाठवितो, आणि नंतर लनासंबंधी बोलणा चालणी सुरू होतात. नंतर मुलीची इच्छा काय आहे, ते विचारतात. कारण केवळ बापाच्याच कबुलीवरून मुलीस लग्न करून घेतले पाहिजे, अशा लोकांत चाल नाही. तिच्या संमतीबाहेर बापास जातां येत नाही. २०० करून परस्परांच्या गोष्टी परस्परांस मानवल्या. आणि लग्नाचा बेत ठरला, या वरपक्षाकडची मंडळी मुलीच्या बापास झणजे "आपण आपली कन्या, (अमक्या अमक्या आमच्या वरपुरुषाला) वध नेमस्त करणार ना? काय ता लाम लासा होऊ द्या." ह्यणजे मग बाप त्या गोष्टीस रुकार देतो. नंतर लग्नाताथ ठरली झणजे, नवरदेव हातांत दिवा घेऊन, वधूच्या तंबूकडे जातो, वत' नवरदेव बकऱ्याची गर्दन छाटतात, आणि त्यांतून रक्ताचा थेंब जमिनीवर पडल पुरे, की, लग्नसमारंभ उरकला, असे समजतात. त्या वेळी स्त्रीपुरुर्षे मेजवान्यावर मेजवान्या झोडून, व गायनवादनादिकेंकरून रंग उडवितात. सूयोस्त झाल्याबरोबर नवरदेव, व-हाडमंडळीच्या तंबूपासून बऱ्याच अंतरावर, खुद्द त्याच्याच करितां ठोकलेल्या तंबूकडे, निघून जातात. तेथें तो एकटाच दार बंद करून, आपल्या प्रियकरणीच्या वाटेकडे डोळे लावून बसतो. ती वधू मुलगी त्या वेळी ह्या तंबूपासून त्या तंबूपर्यंत एकसारखी पळत सुटते, परंतु शेवटी तिला कोणी तरी पकडतात, आणि काही बायका तिला खेचून नवरदेवांच्या तंबूकडे नेतात. नंतर नवरा तिला दारांत धरतो, आणि आंत ओढून नेतो. मग बरोबर आलेल्या स्त्रिया माघान्या परततात. ही चाल, ज्या वेळी रानटी लोक, लग्नाच्या बायका ह्मणून, बळजबरीने स्त्रियांना पळवून नेत असत, त्या वेळचे स्मरण देते.