या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ४ था. एप्रिल १८९९. जर एखाद्या आरबाला आपल्या बायकोच्या दुर्वर्तनाबद्दल संशय आला, तर तो तिच्या बापाच्या व भावाच्या समक्ष तिची निर्भत्सना करतो. आणि यदाकदाचित् तिचा अपराध चांगल्या प्रकारे शाबीत झालाच, तर तिचा खुद्द बाप किंवा भाऊ, जो कोणी असेल तो तिला, कंठस्नान घालतो. हा आरब लोक, जरी बहुधा एकच स्त्रियेशी समानवृत्तीने राहातात, तरी ते वारंवार बायका बदलतात. जेव्हा एखाद्या आरबाचा व त्याच्या बायकोचा, कांहीं क्षुल्लक कारणांवरून, परस्पर बिघाड होतो, तेव्हां तो स्वतः फक्त 'एन् तलिक' - 'तुझ्याशी काडी मोडली आहे' एवढेच ह्मणून, तिला सोडचिठ्ठी देतो. नंतर तो तिला एक सांड देऊन, बापाच्या तंबूकडे-माहेरी रवाना करून देतो. त्यांत त्याला कोणत्याही प्रकारे कारणे सिद्ध करून द्यावी लागत नाहीत, की घटस्फोट कलेल्या स्त्रियेला किंवा तिच्या कुळाला ह्या गोष्टीने कलंक लागला असेंही होत नाही, तथापि प्रत्येकजण त्या पुरुषाला ती त्याला आवडत नाही' असें ह्मणून दूषण देतो. केव्हां केव्हां त्याच दिवशी तो दुसऱ्या एखाद्या स्त्रियेशी वानिश्चय करतो. परंतु, दुसरीकडे त्याची सोडचिठी दिलेली बायको, दुसऱ्याशी लग्नसंबंध जोडण्यापूर्वी चाळीस दिवस दम धरते. कारण पहिल्या नवऱ्यापासून गर्भस्थापना झाली आहे किंवा नाही हे पहावयाचे असते. जिला बरीचशी मुलेबाळे झालेली असतात, अशा स्त्रियेचाही कधी कधी घटस्फोट होतो. ज्यांना पन्नास निरनिराळ्या बायका आहेत, अशी ४५ वर्षांच्या वयाची मनुष्ये देखील आरबस्थानांत दृष्टोत्पत्तीस येतात. ज्याला एक उंट खर्च करण्याची ऐपत असते, तो आरब हवा तर व हवा तेव्हां काडी मोडतो व नवीन बायका करतो. SIRFISHIP PriSTERपतव्यवहार रा. रा. केरळकोकिळकर्ते यांस:- काण्ड सा. न. वि. वि. आपण आपल्या १२ व्या पुस्तकाच्या ८ व्या अंकांत 4चवटीस्थळनिर्णय' लेखावर टीका करतांना कै. रा. रा. वामन दाजी ओक यांच्या मताचे खंडन केलेले मला मान्य आहे. हल्लींचें निजाम सरकारचे राज्य व झैसूरचे राज्य मिळून प्राचीनकालचे दंडकारण्य झालेले होते. या प्रदेशांतील लोक काळे कुळकुळीत व धिप्पाड आहेत व राक्षसभुवनादि त्यांची गांवे याच प्रदेशांत आहेत. यावरून दंडकारण्यांतून प्रवास करणे त्या वेळी फारच श्रमाचें व धोक्याचे असे. रामाच्या पूर्वीचे राजे अश्वमेध करण्यापूर्वी