या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

mire केरळकोकिळ, पुस्तक १३ वें. पृथ्वी जिंकण्यास निघत. ते प्रथम बंगाल्याकडे भागीरथीच्या तीराने जाऊन पुढें कटक, श्रीशैल्य, नीलगिरी, सह्याद्रि इत्यादि पर्वतांच्या आजूबाजूने हहणजे साधारणपणे समुद्रकिनाऱ्याने प्रवास करून परत येत. रघु हा द्वारकेहून पुढे सिंध, बलुचिस्थान, कंदाहार, काबूल, काश्मीर, इत्यादि हल्लीच्या सरहद्दीवरून देश जिंकित गेल्याचे प्रसिद्ध आहेच, रामही प्रथम दंडकारण्याच्या सीमेवरून ह्मणजे नासिक, दौंड, सोलापूर, विजापूर, गदग इत्यादि रेल्वे स्टेशनांच्या दिशेने हंपीपर्यंत आला. सीतीमनी, शबरीबन, ही स्थाने याच मार्गात आहेत. हंपी किंवा पंपाक्षेत्र यापुढे मात्र रामास थेट दंडकारण्यामधून जावे लागले व या भयंकर व निबिड प्रदेशांतून प्रथम वाट पाडल्याचं श्रेय दाशरथिरामास दिले पाहिजे, हल्ली बैरागी लोक बहधा रामाच्या वाटेनेच प्रवास करतात. असो.NE पत्र लिहिण्याचा माझा मूळ उद्देश एवढाच की, असत्याचा पराभव करतांना आपल्याकडून सत्यही थोडे चुरडले गेले आहे. सिंहलद्वीप लंका नव्हे, असे श्रीमंत कुरुंदवाडकर बापूसाहेब यांचें व आपलेही मत आहे असं पण तसें ह्मणणे प्रत्यक्षाशी विरुद्ध आहे. केवळ भास्कराचार्यांच्याच उक्तीवर आपला पाया असेल तर, आचार्यानी पृथ्वीच्या गोलाकारामुळे भिन्न भिन्न स्थाना सूर्यादिकांचे उदय, मध्य व अस्त एकाच क्षणी निरनिराळे असतात ण्यासाठी पृथ्वीचे पाठीवर ९००.९० अंशांच्या अंतराने काही स्थळे काल्प आहेत. त्यांपैकी काही सत्याजवळ व कांही निवळ काल्पनिक आहेत. व लंका ही पहिल्या वर्गातली. सिद्धपूर व केतुमाल ही दुसऱ्या वगोताल श्लोकाच्या आधाराने सांप्रतचें रोम हे रोम नव्हे, तर उज्जयनीच्या पा ९० अंशांवर पूर्वी दुसरें खरें रोम होतें तें आतां नाहीसे झाले आहे, अस कोणी ह्मणेल तर शोभेल काय ? सिंहलद्वीपाच्या बाजूने प्रतिवर्षी हजारों आग बोटी व गलबतें जातात व येतात, पण खरी लंका त्याच्या आड कधीही या नाही. बरें, ती समुद्रात बुडाली असें ह्मणावें तर तसेंही संभवत नाह। कारण, सेतुबंध रामेश्वरापासून लंका जवळच असली पाहिजे. नाहीतर सतु एकीकडे व लंका एकीकडे अशी अवस्था प्राप्त होते. मला वाटते फार प्राचीन काळी रामेश्वरापासून सिंहलद्वीपापर्यंत सेतूसारखा पायरस्ता होता, व तो समुद्राच्या धडकण्याने जेथे तेथे थोडा धुपून गेला होता. तो मात्र रामाच्या सैन्याने दुरुस्त केला. हा सेतु ह्याच कारणामुळे हल्ली बहुतेक नाश पावून समुद्राखाली