या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ४ था. एप्रिल १८९९. खडकाच्या रूपाने व बेटांच्या रांगेच्या रूपाने हल्ली देखील व्यक्त आहे. यास दुसरें प्रमाण असे की, सिंहलद्वीपांत रानटी हत्ती आहेत. हत्तीसारखा मोठा प्राणी सिंहलद्वीपासारख्या लहान बेटांत वन्यस्थितीत आढळणे असंभाव्य आहे. तर रामाच्या स्वारीच्याही पूर्वी सिंहलद्वीप भरतखंडास जोडणारी पेरिकोपासारखी एक अरुंद संयोगीभूमी होती; व याच वाटेने झैसूरच्या राज्यांतील रानटी हत्ती सिंहलद्वीपांत शिरले असावे. यावर दक्षिण अमेरिकेतील रानटी घोड्याच्या वास्तव्याच्या उपपत्तीसाठी युरोप व अमेरिका यांमध्ये दुसरी एक जंगी संयोगीभूमी कल्पावी लागेल असें कदाचित् आपण टीकेच्या भरांत सोपहास उत्तर द्याल पण आजूबाजूच्या पुराव्याचा विचार केला पाहिजे, ही गोष्ट विसरता कामा नये. सारांश, हल्ली रामेश्वरापाशी सेतूसारखा कांही पाण्यावर व कांही पाण्याखाली जो डोंगर आहे तोच खरा सेतु व सिंहलद्वीप हीच खरी प्राचीन लंका मास मत आहORDIN A RT बागलकोट ( वे० बा० केतकर १५-१-९९ ) ITTISE रा. रा. केरळकोकिळकर्ते यांस:वि. वि. मी आपल्या मासिक पुस्तकाचा ६ वर्षापासून वर्गणीदार झालों आहे. तेव्हापासून, केरळकोकिळांतील गद्य व पद्य यांतील रस मी चाखीत आहे. इतके दिवसांत थोडी फार तरी इच्छा तृप्त व्हावयाची होती ! परंतु ए. खाद्या असमाधानी मनुष्याप्रमाणे माझी इच्छा दुणावत चालली आहे. आताशा असे वाटू लागले आहे की, महिन्यांतून दोन वेळां जरी कोकिळ येईल तरी बरे होईल. मला पहिल्यापासून कवितेची फार गोडी असल्यामुळे, व त्यांतून आपल्या कविता प्राकृत परंतु संस्कृताच्या तोडीच्या असून, त्यांतील माधुये, शब्दांची सरणी-फारच मनोवेधक असते.-अर्थाला सरळ, उपदेशपर, छंदोभंग तर कधीही व्हावयाचा नाही, अशा सद्गुणांनी भरलेल्या असल्यामुळे, मा प्रथम अंक उघडल्याबरोबर कविता काय आहेत, ह्मणून पाहत असतो. आपले गद्यांतील लेखही सुरेख असतात. पुस्तकपरीक्षेत केवळ हातखंडाच आहे. पद्यांपैकी नास्तिकास जोडगोळी, मुलींची सासरची पाठवणी, इत्यादि कविता धर्मास अनुसरून आहेत. वृक्षोपदेश, मानसपूजा, प्रमाणजीवितौघसाखरेची बाहुलीं, या पद्यांत विलक्षण चातुर्य दिसून येते. ह, व तृचे संबंधानें झांशीकरांचें केलेले समाधान आल्हाददायक