या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ४ था. एप्रिल १८९९. डातून आझांला डोकें ह्मणून वर काढावयाला नकोच ! आणि त्याची फलश्रुति पाहूं गेलें तर, बेडकावर वार करण्याइतकी ! शरीरांत रक्त नाही, आणि चामडींत ढिसूळपणा नाही. फार झाले तर, जेथल्या तेथे दामटी मात्र वळेल! (३) आमचें नांव कळण्याची जिज्ञासा, आपल्याप्रमाणेच आणखीही पुष्कळांची आहे. ते मोठेसें गुप्त आहे असेंही नाही, व प्रकट होण्यापासून काही अर्थनिप्पत्ति होईल असेंही पण नाही. कोणाचा समज असा असेल की ह्यांच्या नांवामागे 'श्रीमंत, रावसाहेब, रावबहादूर;' किंवा पुढें बी. ए., एम्. ए., असा काही इतमाम असेल. पण तसा प्रकार काहीएक नाही. रामा, कृष्णा, गोविंदा अशांचपैकी एखादें नांव असणार. तें सांगितले काय, न सांगितलें काय, इत्यर्थ सारखाच. -ए० के० को पहिल्या अंकातील बुद्धिबळाचा प्रश्न. सदरहू प्रश्नांची उत्तरें ह्मणून २१ गृहस्थांकडून आली आहेत. त्यांत एक एकांनी ज्या ताना तोडून उतावीळपणा प्रकट केला आहे, तो कांही अवर्णनीय आहे ! कोणी ह्मणतो हा प्रश्न मी एका तासांत सोडविला, तर दुसरा ह्मणतो मी पांच मिनिटांत सोडविला. कोणी ह्मणतो मी तर तो जातां जातांच सोडविला, ह्यांत येवढी प्रतिष्ठा ती कसली? आणि 'खुबीदार'पणा तो काय ? कोणी झणतो तुझी चुकले आहांत, पुरा विचार करा. कोणी ह्मणतो माझें नांवच तुझांला पाहिजे असेल तर, 'अलमगीर' छापखानेवाल्याला विचारा. कोणी बिनतोड ह्मणतो, तर कोणी साक्षीदारांची नांवनिशी देतो. कोणी जाड कागद घालून दोन आणे भूर्दंड पाडतो, तर कोणी पदरचा पोष्टखर्च भरून आधीच मला उत्तर कळवा ह्मणतो. इतकेंही करून एका गृहस्थाचे उत्तर जरी बरोबर येते, तरी चिंता नव्हती. परंतु सारीच उत्तरें चुकली आहेत, कशी ती पहा:(१) पहिला मेळा १७ असामींचाः-ह्यांची सोडविण्याची रीती: जाडा. आना बारिक १हवx२शह १ प्या-द्याने हत्ती घेतो. २ उं-राउंx२शह २ रा-रा-५ ३व-व५४शह ३ राम्राउंx६