या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केरळकोकिळ, पुस्तक १३ वें. योगी पडतो. जसेंः-नररत्न, स्त्रीरत्न, गजरत्न, पुत्ररत्न, कन्यारत्न इत्यादि. १ हिरा; २ माणिक किंवा लाल; ३ नीळ; ४ पाच; ५ पुष्पराज ६ याकूत; ७ गोमेद; ८ मौक्तिक किंवा मोती; आणि ९ पोवळे ही नवरत्ने मुख्य होत. ह्यांशिवाय तोरमल्ली, मार्जारनेत्री, लसण्या, इत्यादि आणखीही हलक्या प्रतीची रत्ने आहेत. सवीत श्रेष्ठ रत्न जो हिरा, तो कोळशाचा बनलेला असतो येवढेच नव्हे, तर त्याच्या आंगी दाह्यधर्मही असतो, ही ध्यानांत ठेवण्यासारखी गोष्ट आहे. साऱ्या पृथ्वीवर फार प्रसिद्ध असे पंधरा सोळा हिरे आहेत. पोतुगालच्या राजापाशीं एक कोंबडीच्या आंड्यायेवढा हिरा आहे. त्याचे नांव बागांझा. ह्याचे वजन १६८० क्याराट झणजे ३३६० रति आहे. ह्याची किंमत ५८,३६,००,००० रुपये आहे. यवढा मोठा हिरा साऱ्या पृथ्वींत दसरा नाही. दुसऱ्या नंबरचा हिरा कोहिनूर तो प्रसिद्धच आहे. रूस देशाच्या राणीच्या मुकुटांत खबुतराच्या आंड्यायेवढा एक लाल आहे! पारिस येथे ८१३ रति वजनाचा सुमारे अर्ध्या कोंबडीच्या आंड्यायेवढा लाल आहे. ब्रह्मदेशच्या राजापाशी १९०० रति वजनाचा एक निभेळ असा नीळ होता. औरंगजेब बादशाहापाशी ३१४ रति वजनाचा पुष्पराग असून त्याची किंमत त्याने १.८०,००० रुपये दिली होती. आज विशेषकरून गोमेदाविषयी विचार करावयाचा आहे. ) गामद हा सिलिका किंवा गार ह्याचा बनतो. गारेमध्ये सूक्ष्म सर पदार्थ मिसळून तीस रंग चढला ह्मणजे गोमेद ह्मणतात. गोमेदाने हिन्याप्रमाणेच कांचेवर रेषा पडतात. प्रत्येक गारेचा दगड सूक्ष्मदर्शकयंत्राने तपासला तर त्यांत स्पंज, पोंवळे, व दुसरे समुद्रांतील प्राणी ह्यांचे अवशेष आढळून येतात. तसेच गोमेदांतही येतात. गामेदाला मूळचा असा कोणताच रंग असत नाही. परंतु तो उन्हांत किंवा दिव्यापुढे फिरविला असतां अति सुंदर अशा अनेक तन्हेत हेच्या रंगांच्या झ्याकी दृष्टीस पडतात. हे रत्न भरीव नसते. तर त्याच्या आंत बारीक बारीक खळग्या असून त्यामध्ये हवा व कधी कधी पाणीही भरलेले आढळतें, व त्यामुळेच त्याच्यामध्ये रंगांच्या झ्याकी दिसतात. हे रत्न भूमीतून काढतांना नरम असते, पण हवा लागली प्रम