या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ५ वा. मे १८९९. विशिष्टगुरुत्व अर्धवट पारद बारीक वाटसापडतात. असा परंतु की ते कठीण होते. ह्याचें काठिण्य ५-६ पासून ६ पर्यंत असते. ह्याचे विशिष्टगुरुत्व २ आहे. ह्याच्यावर मोत्यासारखें तेज असून तो दुधासारखा पांढरा, व अर्धवट पारदर्शक असतो. ह्यास उष्ण केल्याने त्याची अनेकरंगी झांक सुधारते. बारीक वाटाण्यापासून तो कोंबडीच्या आंड्याच्या आकारापर्यंत मोठी ही रत्ने सांपडतात. अमेरिका, आस्ट्रेलिया, व यूरोप इत्यादि देशांत ह्यांचे उत्पन्न फार आहे. परंतु हिंदुस्थानांत हे रत्न कोठे सांपडत नाही. ह्यास झिलई देण्याचे व पैलू पाडण्याचे काम फार कठीण आहे. कारण, ह्याच्या आंत खळग्या खळग्या असल्यामुळे ते काम करण्यास मनस्वी जड जाते. मोठ्या आकाराच्या गोमेदाची किंमत १५ पासून २५ रुपयांनी रति असते. याच जातीच्या काळ्या रत्नाला किंमत फार पडते. कोंबडीच्या आंड्यायेवढ्या काळ्या गोमेदाला पारिसामध्ये १०००० रुपये दिले होते ! हिंदुस्थानांत सिलोनांत ह्यास फार मोलाचे मानतात. हे रत्न जवळ असले झणजे चेटुकाचें कांहीं चालत नाही, असा भोळ्या लोकांचा समज आहे. लंकेंतील लोक अगदी निरुपाय झाल्याशिवाय हे रत्न विकित नाहीत. ह्या खड्यांतील रेषा प्रकाशामध्ये बदलतात, ह्यावरून ह्यांत भूत असावे अशी कल्पना झाली असावी. गोमेदरत्नामध्ये आणखी एक विशेष चमत्कार आहे तो असा. हे रत्न गारेपासून बनत असल्याचे सांगितलेच आहे. गारेचे थर एकावर एक बसून एका विशेष रीतीने ह्याची रचना झालेली असते. त्यामुळे त्यांत एक विशेष प्रकारची आकृति तयार होते. कधी कधी हे रत्न अगदी स्वच्छ असून त्यांत एखादे झाड, फळ, फूल इत्यादि आकृति उत्पन्न होते. ती कधी कधी स्पष्ट असते, व कधी कधी अस्पष्टही असते. त्यांत कधीं जनावरांच्या आकृति असतात, कधी मनुष्यांच्याही आकृति असतात. अशा गोमेदाला 'चित्रयुक्त गोमेद' असे ह्मणतात. ही चित्रे फार सुंदर असतात. ह्मणून श्रीमंत व राजे ती कोंदणांत बसवून त्यांचे अलंकार करितात. शिरोभागी दिलेले चित्र अशा एका चमत्कारिक चित्रयुक्त गोमेदाचें आहे. ते एका फोटोग्राफावरून तयार केले आहे. मास्को शहरामध्ये रशियन सरकारचे एक मोठे देवस्थान आहे; व तेथील भांडारांत देवाची बहुमोल उप.