या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केरळकोकिळ, पुस्तक १३ वे. करणी चित्राच्या मार्माप्रमाणे क्रूसा विलक्षण व करणी व अलंकार ठेवलेले आहेत. त्यांत हे एक अपूर्व गोमेदरत्न आहे. चित्राच्या मधील भाग तो चित्रयुक्त गोमेद होय. त्यामध्ये एक महंत ख्रिस्ती धर्माप्रमाणे असापुढे गुडघे टेंकून प्रार्थना करीत आहे, असे चित्र दिसते आहे, ते किती विलक्षण व स्पष्ट आहे बरें? पण ते कोणी मनुष्याने वगैरे काढलेले नाही. तर, ते त्या रत्नामध्ये आपोआपच उत्पन्न झालेलें आहे ! हे मूळ चित्र इतके चित्तवेधक आहे की, ते एखाद्या कुशल कारागिरानेच काढले आहे की काय असा भास होतो. परंतु त्याची कल्पना चित्रामध्ये कांहींच येत नाही झटले तरी चालेल. हे रत्न कोंदणांत बसवितांना अनेक खदेशीय व परदेशीय रत्नपरीक्षकांनी पुष्कळ प्रकारें बारकाईने तपासून पाहिले व अखेर स. वांनी स्पष्ट सांगितले की, हे चित्र स्वयंभूच उठलेलें आहे. कृत्रिम नव्हे, ह्यांत काडीमात्र संशय नाही. हे अप्रतिम रत्न सैबिरियामध्ये अठराव्या शतकांत सांपडले, आणि तें रशियाची चक्रवर्तिनी राणी दसरी क्याथेराइन हिला नजर भाल होते. तिची मास्को येथील प्यानटोन नांवाच्या गृहस्थावर फार भाक्त होती. ह्यास्तव तिने त्यास ते रत्न नजर दिले. तो त्यास सोन्याच्या साखळीत अडकवून क्रूसासह पदकाप्रमाणे किंवा ताइताप्रमाण गळ्यात घालित असे. हा गृहस्थ इ० स० १८१२ मध्ये वारला. त्यान आपल्या मृत्युपत्रांत लिहून ठेवले होते की, माझी सर्व जिनगी धर्ममठास अपण करावी. त्याप्रमाणे त्याची सर्व जिनगी तेथील मठास अपण करण्यांत आली. तींत रशियाच्या राजघराण्यांतील चवदाव्या शतकापासून झालेल्या सर्व पुरुषांच्या उत्तमोत्तम तसबिरा वगैरे बिनमाल सामान होते. त्यांतच हा गोमेदही होता. ते सर्व सामान उंचे, प्रेक्षणीय असें असल्यामुळे, त्याचे स्मारक ह्मणून अत्यंत पूज्यबुद्धीने त्या मठांत अद्याप मांडून ठेवलेले आहे. तेथेंच हे अप्रतिम रत्नही अद्याप दृष्टीस पडते. त्यास त्याच्या मालकाने मनस्वी द्रव्य खचून सुशोभित केलेले आहे. त्याची कल्पना वरच्या चित्रावरून बरीच येण्यासारखी आहे. ह्या गोमेदाला तद्देशीय लोक देवाप्रमाणे पूज्य मानतात, त्याला नमन करतात, व नवसही करतात.