या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ५ वा. मे १८९९. श्लोक. ह्याच सुसमयीं 'पोतका'कडून आलेला पद्यपुष्पगुच्छ हातांत है देऊन मंगल समारंभ साजरा करतो. खोद्योगें सकलार्थ सार्थक करी, साधूनि साधूपरी SITE सत्कार्यक्षमता, जनांसि समता, चातुर्य नानापरी । जो सत्याचरणी, तशीच करणी निर्दोष ज्याची असे गेले जावजि नांव पावनि जनीं, मोठा महात्मा असें ॥१॥ आतां तत्पुत्र मागें, सरल बहुगुणी, हे तुकारामशेट त्यांनीही अल्पकालें, स्वमतिसरलता, दाविली तेवि थेट । होती हे फार लोकप्रिय निजकृतिनें, दावुनी सभ्य रीता सारे सन्मान देती, निज विमल मनें आज मुंबापुरीत ॥२॥ त्यांनी तज्जनकापरी सुजनता, पाहोनि संपादिली प्रेमें 'जस्टिस आफ दि पीस' पदवी, आंग्ल प्रभूनें दिली । सत्पात्रीं बहुमानदान घडले, संतोष झाला जनां माय केला गौरव धन्य धन्य ह्मणनी, झाली भली योजना ।। २ ।। लोकीं सोज्वल सत्खनींत निपजे, सदन सर्वी कळे सद्वाणींतुनि बोल फोल न निघे, सच्छब्दमुक्ताफळें । सद्वक्षासि रसाळ सुंदर फळे, येती असे नेम हा गया तैसा सत्पुरुषास सत्सुत गमे, हा कार्यकर्ता महा ॥ ४ ॥ राखा लौकिक वाढवा मतिबळे, ठेवा न कांहीं उणे जि दीर्घोद्योग करा दुरून विनये, हे आमचे सांगणे । तर पूज्यत्वें अति आदरें तदुपरी, आमीहि सर्वांपरी ही गुंफोनि सुगंध पद्यकुसुमें, हा गुच्छ देतों करीं ॥ ५॥