या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केरळकोकिळ, पुस्तक १३ वें. ह्याचें नांव मित्र. सायराक्युसचा क्रूर राजा डायोनिसस हा ग्रीक होता. त्याने एका तत्त्ववेत्त्याला विनाकारण शिरच्छेदाची शिक्षा दिली. ह्या सत्पुरुषाचें नांव डेमन असे होते. शिरच्छेदाचा दिवसही नेमला गेला. तेव्हां त्याने मोठ्या लाचारपणाने त्या पाषाणहृदयी राजाची प्रार्थना केली की, माझी बायकामुले फार दूर आहेत. त्यांना एक वेळ जाऊन शेवटची भेट घेऊन येण्यास परवानगी मिळावी. नेमलेल्या दिवशी मी खास-बिनहरकत-परत येईन. ह्यावर डायोनिसस ह्मणाला " पण तूं न आलास तर तुझे काय घ्या ? ह्याकरितां तूं जर आपल्या मोबदला कोणीतरी एक मनुष्य आणून जामीन ठेवशील, तर त्याचा तरी आमांस प्राण घ्यावयास मिळेल. ही अट तुला पतकरत असेल तर जा." तेव्हां अर्थातच डेमनने आपल्या बायकामुलांस भेटण्याची आशा सोडून दिली. कारण, असा जामीन मिळणे, आणि त्यासाठी दुसऱ्याची याचना करण, I खाद्या आपल्या मित्रास अशा जोखमांत घालणे, इत्यादि गोष्टी त्यास दुरापास्त होत्या व मनालाही प्रशस्त वाटेनात. मा डेमनचा एक जिवलग मित्र होता, त्याचें नांव 'पिथिअस'. त्याच्या कानावर ही गोष्ट गेली. तेव्हां तो डेमनच्या नकळत राजाकडे जाज ह्मणाला "डमनला जामीन होण्यासाठी मी आलो आहे. त्याच्या पायातील बेड्या काढन माझ्या पायांत ठोकाव्यात, आणि त्याच्या मला तुरुगात ठवावे, आणि त्याची सुटका करावी ह्मणजे उपकार हा. तील.” डायोनिससला ह्या गोष्टीचे मोठे नवल वाटले. आणि साश्चय मुद्रेने तो त्यास ह्मणाला "आणखी तो नेमलेल्या दिवशी आला नाही तर तूं मरण्याला तयार आहेस?" पिथिअसनें उत्तर दिले “होय. अगदी एका पायावर त्यासाठीच तर मुद्दाम आलो आहे. याप नव्हे, तर तसा योग जमून आल्यास मी आपणास मोठा भाग्यवान समजेन.” असा त्याचा दृढनिश्चय पाहून डायोनिससने ती गोष्ट मान्य केली. आणि डेमनला मोकळे करून घरी जाण्यास आज्ञा दिली,, व पिथिअस ह्याला कैदेत ठेवले. पिथिअसनें आपणावर अकस्मात्