या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ५ वा. मे १८९९. १०६ येवढा उपकार केला, हे पाहून डेमन तर त्याचा अतिशयच उपकारबद्ध झाला; व शिरच्छेदाच्या नेमलेल्या दिवशी खास येतों असें सांगून तो बायकामुलांकडे शेवटचा निरोप घेण्यासाठी निघून गेला. मात परत येतांना डेमनला वाटेमध्ये इतक्या अपरिहार्य अडचणी आल्या की, त्याचा शिरच्छेद करण्याचा दिवस उगवला तरी सायराक्यूस येथे त्याच्याने पोचवले नाही. शिरच्छेदाचा दिवस जसजसा जवळ येत चालला, तसतशी डायोनिससला तुरुंगांत जाऊन पिथिअसास भेटण्याची फार उत्कंठा लागली होती. कारण, त्यास असे वाटत होतें की, डेमनने आपल्या वचनास हरताळ लावून बहुतेक बेइमानीपणा केला, व अशा मनुष्याची जामीनगत पतकरल्याबद्दल पश्चात्ताप झायाचे पिथिअसच्या तोंडून ऐकावयास मिळेल. परंतु तो उदारात्मा मंत्राप्रीत्यर्थ मरणाची दुर्मिळ संधि आपणास प्राप्त झाली ह्मणून अत्यंत निदित झालेला मात्र दृष्टीस पडला. कारण, आपल्या जिवापेक्षा मनच्या जिवाची किंमत अधिक आहे, हे तो पक्केपणी जाणून होता. आणखी, त्या वेळी वाराही प्रतिकूळ वाहत असल्यामुळे आपल्या मि स वेळेवर खचित येतां येणार नाही, असे वाटून त्याची आशा अधकच बलवत्तर होत चालली. TS THE शिरच्छेदाची वेळा होतांच पिथिअस ह्याला वधस्थानी नेल. आता वेडगळ व भोळा मनुष्य तोंडघशी पडून प्राणास कसा मुकतो, हे ाहून डोळ्यांचे पारणे फेडून घेण्यासाठी डायोनिसस महाराजही डोव्यांत तेल घालून बसले होते. पाहणाऱ्या लोकांचा सभोंवार पाळा पडला होता. त्यांच्याकडे पाहून पिथिअसने थोडक्यांत आपली व आपल्या मित्राची हकीकत समजवून दिली व ह्मणाला " तो माझा जिवलग मित्र डेमन आता मात्र लौकर येण्याची चिन्हें दिसतात, आतां काय करावे ? वारा त्यास अनुकूल झाला. आतां तो लौकर येण्याचा संभव आहे. याकरितां त्याच्या कुटुंबास, मित्रास, व देशासही मौल्यवान् असणारा जीव, माझ्या मोबदल्याने वाचण्याची आशा खुंटतेसे दिसते. कारण, आज बरेच दिवस त्याच्या मार्गाच्या विरुद्ध दिशेने वारा वाहत होता, तेव्हां माझ्या मित्रास येथे येणे कठिण होते. परंतु फालपासून वारा बदलला आहे. त्यामुळे डेमन लौकरच येथे हजर हो १४