या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ५ वा. मे १८९९. श्रेष्ठ पायरी मात्र राहिली आहे. राजयोगाचा हेतु आणि फलश्रुति तीच. आणि तो आमांस अखेरीस पोंचविणारही तेथेंच, मानवी प्राणी ह्या नात्याने आपणास माहितच आहे की, ज्यास आपण सयुक्तिक किंवा तार्किक ज्ञान असें ह्मणतो, तें सारें ज्ञान आपणांस जाणिवापासून प्राप्त होते. हे टेबल आहे हे मला कळते; आपण येथे आहां हे मी जाणतों. आणखीही असेंच दुसरें. आणि त्यावरूनच आपण येथे आहां; टेबल येथे आहे ह्याचे मला ज्ञान होते. अशाच रीतीने मी जें जें पाहतों; जें जें ऐकतों; ज्याचा ज्याचा मला स्पर्श होतो; ते ते सारे पदार्थ येथे असल्याचे समजण्यास कारण होते. पण तसाच, माझ्यांतला पुष्कळ भाग असा आहे की, त्यांच्यांतलें मुळीच कांहीं मला कळत नाही. शरीराच्या आतील सारे अवयव; मेंदूचे निरनिराळे भाग; प्रत्यक्ष मेंदू; हे पदार्थ कोणासच कळत नाहींत-त्याविषयींचे ज्ञान होत नाही. जाया मी अन्न खातो, तेव्हां तें मी समजून उमजून खातों.. पण ते पचवितांना मात्र न कळून पचवितो. अन्नाचे रक्त बनतें तें न कळतां बनते. रक्तापासून माझ्या शरीराचे जे निरनिराळे भाग तयार होतात, ते मला न कळतां तयार होतात. तरी ते करणारा मी ह्मणून जो कोणी तोच होय. ह्या एकाच शरीरामध्ये कांहीं पांच पंचवीस असामी असू शकणार नाहीत. पण हे मीच करतो, दुसरा कोणी करीत नाही, हे कशावरून समजावें ? कदाचित् असेंही असू शकेल की, अन्न खाणे येवढेच काम माझ्याकडे असेल, आणि अन्नाचे पचन करणे, अन्नापासून रक्त बनविणे, हे माझ्या मोबदला दुसराच कोणी करित असेल. पण असे होणे शक्य नाही. कारण, ज्या ज्या क्रिया आज आपणास समजत नाहीत, त्यांतील बहुतेक पुनरपि जाणीव स्थितीमध्ये आणतां येतात, ही गोष्ट सिद्ध करून दाखविता येते. आमच्या हुकमाशिवाय, आमच्या इच्छेशिवाय, हृदयाचे ठोके खुशाल चालू असतात. आपल्यापैकी कोणालाच त्यामध्ये कमजास्ती करता येत नाही. ते आपल्याच तंत्राने चाललेले असते, असे वरकरणी दिसते. परंतु अभ्यासाच्या योगानें मनुष्यांना आपले हृदय सुद्धा इतकें ताब्यांत आणतां येते की, (त्यास आपल्या इच्छेनें जलद चाल झटले की जलद चालते; हळू चाल