या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१०८ केरळकोकिळ, पुस्तक १३ वें. मटलें की हळू चालतें; किंवा मुळीच बंद रहा मटले तरी बंद रहाते. किंबहुना शरीरांतला प्रत्येक अवयव आपल्या हुकुमांत आणतां येतो. ह्यावरून काय दिसून येते ? तर ह्या ज्या जाणीवाच्या खालच्या पायरीतल्या क्रिया त्या सुद्धा आह्मीच चालवितों. मात्र इतकेंच की, त्या आह्मी न जाणून चालवितों, किंवा त्या चालवितांना आमांस कळत नाहींत. तर मग मनुष्याच्या मनाच्या व्यापाराला आमच्या जवळ दोन मजले झाले. जाणीव हा पहिला; ह्मणजे केव्हाही 'अहं' किंवा 'मी' ह्या भावनेला धरून होणारा जो व्यापार तो, आणि नेणीव हा दुसरा मजला; अर्थात् अहं भावनेव्यतिरिक्त-त्याच्याच सत्तेखालीं-होणारा जो व्यापार तो. 'मी' ह्या भावनेस धरून होणारा जो मनःक्रियेचा भाग, तो जाणीव व्यापार होय आणखी 'मी' ह्या भावनेशिवाय हाणारा जो मनःक्रियेचा भाग तो नेणीव व्यापार होय. खालच्या प्रतीच्या प्राण्यांमध्ये हा जो नेणीव व्यापार असतो. त्यालाच उपजतबुद्धि असे ह्मणतात. उच्चप्रतीच्या प्राण्यांमध्ये, आणि सवीत श्रष्ठ जा 3 त्याच्यामध्ये अहंभावनेला धरून असणारा जो हा दुसरा भाग चालू असतो. आणि त्यालाच जाणिवाचा व्यापार असें ह्मणतात. सा पण येवढ्यानेच आटोपलें असें नाहीं. तर ह्याच्याही वर एक सरा मजला आहे, आणि त्यांतही मनाला आपला व्यापार चालविता येतो. त्याला जाणीवाच्याही पलीकडे जातां येते. जाणीव व्यापाराच्या खाली जसा नेणीव व्यापार आहे, त्याचप्रमाणे दुसराही एक व्यापार आहे, तो जाणिवाच्या वर असतो. आणि त्यांत सुद्धां 'अहं'-मा-हा स्फूति असत नाही. अहंभाव हा फक्त मधल्या स्थितीत-जाणिवाच्या मजल्यावर मात्र असतो. मन हे ह्या मधल्या मजल्याच्या वर असा की खालीं असो, त्याला "मी" हा भास नाही.तरी मन हे क्रिया करतेच. त्याचा व्यापार चालतोच. मन जेव्हां अहंभावनेच्या मयोदबाहेर जाते, तेव्हां त्यास 'समाधि' किंवा सम्यक ज्ञान असे ह्मणतात. ने जाणिवाच्या वरच्या मजल्यांत असते. पण एखादा मनुष्य समा • धींत असतांना तो आपल्या जाणिवाच्या मजल्याच्या खाली गेला नाही, हे कशावरून?-वर जाण्याच्या ऐवजी तो पतित होण्याचा संभव नाही काय? दोहोंमध्येही अहं स्फूर्तिवांचून व्यापार चालतो.