या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ११ वा. नोवेंबर १८९८. २४९ पाणस्तंभांवर उभारली असून, त्या स्तंभांची रचना अशी मजेदार केलेली आहे की, एकेका रेषेत चाळीस चाळीस खांब, अशा चाळीस समांतर रेषेत ते गोंवले आहेत. हल्ली बहुतेक पडझड झाली आहे तरी अद्याप मधले खांब जमिनीवर जवळ जवळ बारा. फूट उंच आहेत. मधले स्तंभांवर नाजूक नकासकाम केले आहे, परंतु बाहेरचे खांबांवर नक्षी वगैरे काही नाही. त्यांचे पाचरटिले होऊन, ढलपे ढलपे उडून जाऊन, अगोदर निम्मा जीव झाला आहे. त्यांची उंची सारी निम्मीसहा फूट राहिली आहे. ह्या खांबांवर नऊ मजले चढविले होते, त्यांत नऊशे दालनें होती, आणि त्या सवीवर धात्वाच्छादन होते. ह्यावरूनच ह्या वाड्यास 'पितळेचा राजवाडा' असे नांव पडले असावें. ह्या इमारतीचा अंतर्भाग फारच रमणीय होता. अगदी मध्यभागी एक प्रशस्त दिवाणखाना असून, त्यांत सोन्याचे पाणी दिलेले सिंहाचे व हत्तीचे शोभिवंत पुतळे होते. दुसऱ्या बाजूला एक सुंदर कळाकुसरीचे सिंहासन मांडून ठेविलेले असे. प्रतिष्ठित उपाध्यायांकडे अगदी वरचे मजले असत, आणि ज्यांना याज्ञिकीच्या कामांत तितका अधिकार नसे, ते अगदी तळच्या मजल्यावर राहत असत. सिंहली लोकांचे जिने अगदी सुळक्यासारखे असतात. ह्या चालीमुळे ते नऊ जिने चढून जाणे झणजे उतारवयाच्या प्रतिष्ठत उपाध्यायांच्या जिवाचीच परीक्षा होत असे. त्या चालीच्या ह्या दोषामुळे जरी सदोदित कमी प्रतीच्या लोकांपेक्षां ह्या वरिष्ठ जातीस उच्चस्थान मिळे, तरी ते त्यांस त्याच्या दसपटीने त्रासदायक होत असे. अनुराधापुरचा रुबनवेलाशय नावाचा 'दगोबा' २७० फूट उंच असल्याचे लोक सांगतात. हल्ली येथे सभोवार विटांचा ढीग मात्र पडलेला आहे. त्यावर गवत गजबरून गेले आहे आणि त्याची उंची १८९ फूट आहे. त्या इमारतीच्या त्या औरस चौरस ढिगाच्या तळाचा-पायाचा परीघ २००० फूट होता, त्याला मोठमोठाले दगड घातले होते, आणि त्यांभोंवतीं जो चर खणलेला होता, त्याची रुंदी १७ फूट होती. चौथऱ्याच्या चारी बाजू दगडांत हत्तींची गंडस्थळे खोदून सुशोभित केल्या होत्या.