या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

CHELSEA अंक ५ वा. मे १८९९. १०९ ह्याचे उत्तर हे की, व्यापाराच्या गुणावरून व परिणामावरून खालचा मजला कोणता, आणि वरचा मजला कोणता, हे आपणांस समजतें. एखादा मनुष्य जेव्हां अगदी गाढ निद्रेत असतो तेव्हां तो जाणिवाच्या खालच्या मजल्यांत शिरतो. तरी त्याचे शारीरिक व्यापार तो सारखे करीतच असतो. कदाचित् त्याच्या झोंपेमध्ये त्याला अहंभावनेची कल्पनाही असणार नाही, तथापि तो श्वासोच्छास सोडतो, व शरीराची हालचालही करतो. पण त्याला ह्यांपैकी काहींच कळत नाही. तो जेव्हां झोपेतून फिरून पूर्वस्थितीवर येतो, तेव्हां तो तीत शिरतांना जसा असतो तसाच असतो. त्याचे ज्ञान यत्किचित्ही वाढत नाहीं, किवा त्याचा विकासही होत नाही. पण समाधीमध्ये जाणारा मनुष्य आंत जातांना मूर्ख असला तरी साधु होऊन बाहेर पडेल. आज ह्या तफावतीपासून काय होते? एका स्थितींतून मनुष्य परतून येतो तेव्हा तो अगदी पूर्ववतच असतो. ह्मणजे जसा जातो तसा येतो. आणि दुसऱ्या स्थितीतून मनुष्य परत येतो तेव्हां तो ज्ञानसंपन्न, तत्त्ववेत्ता, त्रिकालज्ञानी आणि योगी असा होऊन येतो. त्याचा सारा आयुःक्रम-जीवित-पुनीत-दिव्य-होऊन जाते. अशी ह्या दोहोची दोन निरनिराळी कार्ये आहेत. आतां ही कार्ये जर निरनिराळी आहेत, तर त्यांची कारणेही निरनिराळी असली पाहिजेत. समाधीतून मनुष्य परत आला ह्मणजे जे ज्ञान प्रगट होतें तें जाणिवाच्या खालच्या स्थितीपेक्षां पुष्कळ पटीने श्रेष्ठ, आणि जाणिव स्थितींतील विचाराहूनही अत्यंत श्रेष्ठ असते. मणजे अर्थातच तें जाणिवातीत असते. आणि ह्मणूनच समाधीला जाणिवातीत स्थिति असें ह्मणतात. समाधि मणचे काय ह्याचा हा थोडक्यांत गोषवारा झाला. पण तिचा उपयोग काय ? उपयोग हा. विचाराची व्याप्ति किंवा मनाची जाणिवक्रिया संकुचित आणि मर्यादित आहे. मनुष्याच्या तकाच्या धांवेचे मंडळ अगदी लहान आहे. त्याच्या पलीकडे त्यास जाववत नाहीं; व त्याच्या पलीकडे जाण्याची खटपट करणे हेही व्यर्थ आहे. तथापि ह्या मंडळाच्या बाहेर जे काय आहे तें, मनुष्यजातीला अत्यंत प्रिय आहे. आत्मा अमर आहे की नाहीं ! परमेश्वर आहे किंवा कसे? हे ब्रह्मांड चालविण्यांत कांहीं अद्भुत सामर्थ्य आहे किंवा नाही ? हे