या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केरळकोकिळ, पुस्तक १३ वें. आहे तेथपर्यंत प्रेम ही तरी काय काय झणून करावें ? सारे प्रश्न तर्कक्षेत्राच्या बाहेरचे आहेत. ह्या प्रश्नांचे उत्तर विचाराच्याने देववत नाही. विचार काय ह्मणतो? हे प्रश्न आह्मांस इतके महत्वाचे आहेत तरी, तो ह्मणतो "मी नेणता आहे. मला होयही माहित नाही, आणि नाहीही माहित नाही." आणि वरील प्रश्नांना समाधानकारक उत्तर मिळा नाही, तर मानवी जीवित केवळ व्यर्थ होय. आमच्या सर्व नैतिक उपपत्ति; आमच्या सान्या सदाचारप्रवृत्ति; आणि मानवी स्वभावामध्ये जें जें कांहीं नैसर्गिक चांगले व थोर आहे तें तें सर्व, विचारातीत येणाऱ्या उत्तराप्रमाणे बनते. आयुष्य हे जर क्षणिक आहे; ब्रह्मांड हे जर दैवगतीने परमाणुसंयोगाने झालेले आहे; तर आमी दुसऱ्याचे बरें तरी काय ह्मणून करावें? त्यांच्यावर दया, न्याय आणि प्रेम ही तरी काय ह्मणून ठेवावीत? हात चालतो आहे तेथपर्यंत प्रत्येकाने आपआपल्या पोळीवर तूप ओतून घ्यावा ढीच काय ती ह्या जगांत इतिकर्तव्यता. कशाचीच जर शाश्वती नसेल, तर आपल्या बंधूवर ममता तरी कां करावी? त्याचा गळाच का कापू नये मृत्यूचा कडक अंमल ह्याच्या पलीकडे जर कांहींच नसल, केव्हाही सुटका ह्मणून होणेंच नसेल, तर येथे मी आपल्या खतःलाच सुख मिळविण्याची खटपट केली झणजे बस्स. लोकांच्या तोंडातून वारंवार हे उद्गार ऐकू येतात, की, सर्व नीतितत्त्वे 'लोकहिता'च्या पायावरच उभारलेली असतात. हा पाया तरी कोणता. तर 3 लोकास पुष्कळ सुख देण्याचा यत्न करणे हा. ते तरी मी काय म. णून कराव: सुख जर माझ्याच उपयोगास येते, तर मी पुष्कळ लोकांना पुष्कळसे दुःख तरी कां देऊं नये? ह्या प्रश्नाचे उत्तर लोकहितैषी काय बरें देतील ? खरें कोणते आणि खोटें कोणते, हे तुह्मांस तरी कळणार कसे ? माझी इच्छा मला सुख मिळविण्यासाठी पुढे करत, आणि ते मी मिळवितो. हा माझा नैसर्गिक स्वभाव आहे. ह्याच्या पलीकडे मला काही माहिती नाही. त्या इच्छा माझ्यामध्ये आहेत, आणि त्या मला पूर्णही पण केल्या पाहिजेत, त्याबद्दल तुमची कुरकुर १ मुळांत Utilitarians 'युटिलिटेरिअन्स' असा शब्द आहे. समाजाचे हित होईल अशा त-हेनें वागणं ह्याला युटिलिटि Utility असें ह्मणतात. आणि हे तत्त्व जे प्रतिपादन करतात त्यास युटिलिटेरिअन्स असें ह्मणतात. twitterma