या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

- अंक ९ वा. मे १८९९. कां ? मानवी जीवित, सदाचार, अविनाशी आत्मा, परमेश्वरभक्ति, दया, सौजन्य आणि सर्वांत श्रेष्ठ जो स्वार्थत्याग इत्यादिकांविषयींची सत्तत्त्वे कोठन आली? गा E STATE सर्व नीतिशास्त्रे, सारी मानवीं कृत्ये, आणि मनुष्यांचे सर्व विचार हे एका स्वार्थत्यागाच्याच कल्पनेवर अवलंबून असतात. मानवी जीविताची सारी कल्पना “स्वार्थत्याग" ह्या एका शब्दांत घालतां येते. आमीं काय ह्मणून खार्थत्याग करावा ? मला स्वार्थत्याग करण्याची आवश्यकता कोणती ? त्यापासून उपयोग काय ? तिच्याने काय होणार? मी काय ह्मणून तसे करावें ? तुझी आपल्याला मोठे सत्यवादी ह्मणत असाल, परंतु मला आपण जोपर्यंत कारण दाखवून देणार नाही, तोंपर्यंत मी आपणांस अज्ञानीच ह्मणेन. मी स्वार्थपरायण कां होऊ नये ? मी पशूप्रमाणे कोणत्याही गोष्टीचा विचार न करितां कां कृत्ये करूं नयेत? त्याचे कारण दाखवून द्या. ही कविकल्पनाच असेल, तर मोठी बहारीची आहे खरी, पण काव्य हे काही प्रमाण नव्हे. मला प्रमाण दाखवून द्या. मी खार्थत्यागी कशाकरितां व्हावें ? मी सौजन्याचाच काय ह्मणून स्वीकार करावा ? कारण, तो फलाणा फलाणा, किंवा ती फलाणी फलाणी असें असें ह्मणते ह्मणून. ह्या बोलण्यांत मला काही अर्थ वाटत नाही. माझ्या स्वार्थत्यागाचा उपयोग कोठे होणार? उपयोग झणजे 'सुखाचें सर्वस्व ' असा अर्थ धरला तर, आत्मस्वार्थी होण्यांतच माझा उपयोग आहे. दुसऱ्याला ठकविण्यांत आणि त्यांचा अपहार करण्यांतच मला अतिशय सौख्य मिळण्याचा संभव आहे. ह्याच्यावर उत्तरे काय ? लोकहितैषींना कांहीं तीं देता येणार नाहीत. विश्व हे अपरंपार महोदधींतील एक बिंदु व अनंत शृंखळेतील एक दुवा आहे, हेच त्याचे उत्तर. ह्मणजे ह्या जगाशी आपला संबंध अगदीच थोडा, केवळ 'दरयामे खसखस ' असाच आहे. आपल्याला इंद्रियातीत जगाचाच विचार फार केला पाहिजे. जे लोक मनुष्यजातीला वळण लावतात; स्वार्थत्यागाचा उपदेश करतात, त्यांनी तरी ही कल्पना कोठून आणली ? ही उपजत बुद्धि नव्हे हे तर आमांस माहितच आहे. कारण, ज्या पशुंना उपजत बुद्धि आहे, त्यांना ही कल्पना