या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ५ वा. मे १८९९. लट; अशा मनःपूत गोष्टी जेव्हा जेव्हां आढळून येतील, तेव्हां तेव्हां कोणत्याही प्रकारची पर्वा न करितां बेलाशक टाकून दिल्या पाहिजेत. कारण, खरा साक्षात्कार ह्मणून जो असतो, तो कधीही नाश करावयाचा नाहीं, पूर्तता करील. मोठमोठ्या धर्मकोविदांनी झटले आहे की, "मी नाश करण्याकरितां आलों नाही. पूर्तता करण्याकरितां आलो आहे.” तद्वत् साक्षात्कार हा केव्हाही विचारशक्तीची पूर्तता करण्याकरितांच येतो, आणि तो विचाराशी अगदी बरोबर जुळून असतो. जेव्हा जेव्हां विचाराच्या विरुद्ध गेलेला दृष्टीस पडेल, तेव्हां तेव्हां तुझी मनांत खूणगांठ बांधली पाहिजे की तो कांहीं साक्षात्कार नव्हे.गोगाजावाजाला योगाच्या ज्या निरनिराळ्या पायऱ्या आहेत त्या शास्त्रमार्गाप्रमाणे आक्रमण केल्या तर त्या जाणिवातीत स्थितीला किंवा समाधीला पोचवितात. आणखी त्यामध्ये एक मख्खी ध्यानात ठेवण्यासारखी आहे. ती ही की, ही साक्षात्कार होण्याची शक्ति जितकी प्राचीनकाली होऊन गेलेल्या धर्मस्थापकांमध्ये होती, तितकीच प्रत्येक मनुष्यामध्येही आहे. त्या विभूति झणजे कांहीं अद्वितीय होत्या अशांतला अर्थ नाही. आमी व तमी जसे आहों तसेच तेही होते. ते महायोगी होते. हा द्र यातीत ज्ञानशक्ति त्यांस प्राप्त झाली होती; व तीच तुमाला मा झालाही प्राप्त करून घेता येईल. ते मनुष्य ह्मणजे कांहीं आकाशांतून पडलेले होते, अशांतला भाग नाही. ती स्थिति किंवा तें सामर्थ्य प्रत्येक मनुष्यास प्राप्त होणे शक्य आहे. ह्याला एक वेळ एक मनुष्य त्या स्थितीला पोचला होता, येवढी साक्ष बस्स आहे. ती गोष्ट शक्य आहे येवढेच नव्हे, तर प्रत्येक मनुष्य आज ना उद्यां त्या स्थितीला पोचलाच पाहिजे. आणि त्याचंच नांव धर्म-अनुभव. हाच काय तो आमचा गुरु. खतःला अनुभव नसतां, रतिमात्रही सत्य न समजतां आपण कितीही बोललों, आणि कितीही विचार केला, तरी व्यर्थ-पोकळ होय. तो कांहीं धर्म नव्हे. एखाद्या मनुष्याला थोडीशी पुस्तकें दिली, ह्मणजे तेवढ्यानेच तो कांही शस्त्रवैद्य होतो असें नाहीं. एखादें शहर प्रत्यक्ष पाहिल्याने जसे माझ्या मनाचे समाधान होईल, तसें तुह्मीं त्याचा नकाशा दाखविल्याने काही होणार नाही. ते मी