या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

। अंक ५ वा. मे १८९९. ११७ प्राप्त व्हावयाचें नाही. आझाला खरे सौख्य आणि समाधान ह्मणून जें होतें तें साक्षीभूत राहून पदार्थाच्या सहवासाचे फक्त चिंतन कर-" ण्यानेच होते. पशुंना इंद्रियज्ञानांत सौख्य आहे; मनुष्यांना त्यांच्या बुद्धिज्ञानांत सौख्य आहे; आणि ईश्वराला अध्यात्मज्ञानांत सौख्य आहे. ही आनंदमय स्थिति आत्म्याला प्राप्त झाली की, जग हे खरोखरच मनोहर दिसू लागते. ज्याला कशाचीच इच्छा नसते, आणि जे त्याच्यांत आपणहून मिसळतच नाहीत त्यांना सृष्टीचे अनेक फेरफार हे सौंदर्याचा आणि श्रेष्ठत्वाचा एक चित्रपटच आहे. तलाम हे ध्यान किंवा एकाग्रतेचे विवरण नीट लक्ष्यात ठेवावें. आतां आपण शब्द ऐकतों, मणजे काय ? तर प्रथम बाह्य हवेतील लहरी. दुसरा, त्या मनाला नेऊन पोचविणारा ज्ञानतंतूचा प्रवाह. आणि तिसरी मनाची प्रतिक्रिया. तिच्या योगानें बाह्य पदार्थाची कल्पना हाऊन लगेच आपल्या हृत्पटलावर प्रकाश पडतो. बाह्य पदार्थ हा फक्त मनाची प्रतिक्रिया, ज्ञानरसाचा प्रवाह, ह्या निरनिराळ्या कायोस निमित्त मात्र होतो. ह्या तिहींना योगामध्ये शब्द, अर्थ, आणि ज्ञान अस ह्मणतात. अर्वाचीन प्राणिशास्त्रभाषापद्धतीप्रमाणे ह्यांनाच ईथरच्या लहरी, ज्ञानतंतूतील आणि मेंदूतील गति; व मानसिक प्रतिक्रिया अशा तीन नावे आहेत. ह्या तिहींच्या क्रिया अगदी पृथक पृथक असताही, त्या परस्परांत इतक्या मिश्रित झालेल्या आहेत की, आपणास त्या एकरूपच दिसतात. खरोखर ही तिन्ही कायें आमाला मुळाच कळत नाहीत. ह्या तिहींचा परिणाम मात्र काय तो आमाला दिसून येतो. आणि त्या परिणामालाच आह्मी बाह्य पदार्थ असें ह्मणतो. ज्ञानाचे प्रत्येक कार्य, ही तिन्ही मिळून करतात. असे असतां त्यांच्यातील भेद आझांस कां कळू नयेत हे काही सांगता येत नाही. एक । प्रथमची सर्व साधनें झाल्यानंतर मन जेव्हां हुकुमबंदें होऊन रहाते, तेव्हां त्याला अंतर्ज्ञानाची शक्ति प्राप्त होते. ती प्राप्त झाली झणजे मग त्याला ध्यानाकडे लावावें. ध्यानाचा प्रारंभ स्थूल पदार्थोपासून करावा, आणि मग ते हळू हळू सूक्ष्माकडे वळवावे. मग त्याहून सूक्ष्माकडे नेत नेत निर्विषयांत घालावें. पहिल्याने मनाला इंद्रियज्ञानाची बाह्य कार्ये पहावयास लावावे. नंतर अंतर्गतशक्ति । Writi O ETE STREENAME