या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केरळकोकिळ, पुस्तक १३ वें. आणि नंतर मनाच्या प्रतिक्रियेकडे लावावें. इंद्रियज्ञानाची बाह्यकायें पाहण्यामध्ये ते निष्णात झाले झणजे सर्व सूक्ष्म जडतत्त्वे, सूक्ष्म जड आकार पाहण्याचे त्यास सामर्थ्य येते. अशा प्रकारे तें अंतस्थ व्यापार पाहण्यांत पटाईत झाले झणजे मग त्याला आपल्यांतील किंवा दुसऱ्यांतीलही मनोविकार समजतील. इतकेच नव्हे, तर बाह्य क्रिया घडण्यापूर्वीच त्याला ते कळतील. मानसिक प्रतिक्रिया त्यास जशाच्या तशा कळू लागल्या ह्मणजे योग्याला अनेक गोष्टींचे ज्ञान होते. कारण प्रत्येक ज्ञेय वस्तु व प्रत्येक विकार हा प्रतिक्रियेचा परिणाम होय. नंतर जणों काय मनाचे सर्व पाये त्याला पहावयास मिळाल्याप्रमाणे, ते सर्वतोपरी त्याच्या ताब्यांत येईल. योग्याला निरनिराळ्या अनेक शक्ति प्राप्त होतात. त्यांपैकी एखादीला जरी योगी भुलून पडला, तर त्याच्या पुढील रस्त्यांत त्याला अटकाव होतो. वि. षयाकडे धावण्याचा परिणाम हा असा अनिष्ट आहे. पण जो हवा खबार मनाचा असेल, ह्या अद्भुत शक्तींनाही झिटकारण्याचे ज्याला सामथ्र्य असेल, मनस्समुद्रांतील यच्चयावत् लाटांना दडपून टाकण्याचा ज्याला हिय्या असेल, तोच योगाच्या शेवटास पोचल. नंतर आत्मप्रभाव, मनाच्या सर्व पाशांतून मुक्त होऊन शरीराच्या सर्व विकारापासून सुटून आपल्या दैदीप्यमान तेजानें प्रकाशमान होतो. आणि योग्याला आपलें ज्ञानमय, अमर, सर्वव्यापी अस साल मूळ स्वरूप दिसू लागते. समाधि ही प्रत्येक मनष्यप्राण्याची-नव्हे प्रत्येक प्राण्याचा उप मिराशाचा जागा आहे. अतिशय हलक्या प्राण्यापासून तों उच्च प्रतीच्या देवादिकांपर्यंत प्रत्येकाला केव्हांना केव्हां तरी ह्या स्थितीत याव लागते. आणि तो ह्या स्थितीत आल्यानंतरच त्याच्या धर्मास प्रारंभ होतो. तर मग बाकीच्या कालपर्यंत आमी काय करित असतो. त्या स्थितींत जाण्याकरितां फक्त धडपड करित असतो. ज्यांच्यामध्ये धर्म नाही, त्यांच्यामध्ये आणि आमच्यामध्ये आजमितीला कांहींच अंतर नाही. कारण, त्याचा अनुभव असा आह्मांला कांहींच आलेला नाही. तर मग हा बिनतोड रीतीने अनुभव येण्याला आझांला ह्याशिवाय दुसरा उत्तम उपाय कोणता? ह्या समाधींतील प्रत्येक पायरीचे सप्रमाण प्रतिपा