या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ६ वा. मे १८९९. ११९ दन करून परस्पर संबंधाची एकवाक्यता करावी; शास्त्रोक्त रीतीने व्यवस्था लावावी; आणि दृढ निश्चयाने अभ्यास करावा; ह्मणजे त्या इच्छित ठिकाणी खात्रीने जाऊन पोंचूं. ह्मणजे मग सर्व दुःखें लयास जातील; सकल विपत्तींचा अस्त होईल; कर्माचे बीज जळून खाक होईल; आणि आत्मा चिरकाल मुक्त होऊन राहील. (4०१२ अं० ११ मधाल.) (पु० १२ अं० ११ मधील.) काव्यकूटोत्तर. ॥श्लोक. ॥ रा. रा विष्णु बाबाजी कुळकरणी-कल्लोळ यांजकडून. मालाल तेजाची लतिका खरी निरुपमा तूं अंबराभ्यंतरी । पिता सौंदर्य वरवैभवें विलससी सन्मेघवृक्षावरी ॥ लीलेतें तुझिया बघोनि अतुला साश्चर्य होतें मन । ऐशा कोण न ओळखील तुजला सौदामिनीला जन १ ॥ १॥ आझांला कनकप्रभे ! सुरुचिरे ! तूं दृश्य होसी जरी । मायावी चपले ! अदृश्य फिरुनी होसी क्षणाभीतरी ॥ वाटे की मजला, स्वरूप अपुलें पाहील पापीजन । भीती ही धरुनी मनीं तनुवरी घेतेस आच्छादन ! ॥ २ ॥ वेगाने चपले ! जई तळपसी तूं कृष्णमेघावरी । त्या वेळी गमसी "सुवर्णनिकषस्निग्धा' मला गोजिरी ॥ तेजातें तुझिया सहस्रकर तो तेजोनिधी पाहतां । की जाईल दिपोनि; काय अमुची या मानवांची कथा ? ॥३॥ गर्वाने परि चंचले ! तव मती वाटे पुरी ग्रासिली । की तूं अद्भुत शक्ति सर्व जगता दावोनियां आपुली ॥ भीतिव्याप्त करावया वरिवरी उद्युक्त सौदामिनी ! । मोठा दुर्गुण हा तुझा, स्थल भले गर्वा न देती मनीं ॥ ४ ॥ १. ही पत्रे, काव्यगुणांप्रमाणे सरसनिरसाची निवड करून छापण्याजोगी तेवढींच क्रमश: छापली जातील.