या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१२० केरळकोकिळ, पुस्तक १३ वें. - जेव्हां कड्कड कर्कशा अविरता त्वद्गर्जना चालते। आतां एक करोनि सोडिसि गमे आकाश पाताल तें॥ प्राण्यांची हृदयें समस्त अदयें! जाती भयें फाटुनी । भासे मांडियला खरा प्रलय की विश्वंभरें कोपुनी ! ॥ ५ ॥ केव्हां तूं खवळोनि शीघ्रगतिने खाली उडी टाकुनी । हा ! हा! घोर अनर्थ गे! उडविसी तात्काल; विध्वंसुनी ।। मोठा तो मग वृक्ष, मंदिर असो किंवा अतो मानव । युक्तायुक्तविचार खास तुझिया चित्तांत नाही लव ॥ ६ ॥ मोठी शक्ति अपार विक्रम तसा आंगी तुझ्या जो वसे । वाढो तो (दे) झणणें न त्याजविषयी माझें मुळी गे! असे ॥ घाला घालुनि हा अनर्थ करिसी आह्मांवरी कासया । दीनांचा करितां विनाश अवघे श्रेष्ठत्व जातें लया ! ।। ७ ॥ तूं स्वर्णप्रभ गौर सुंदरतनू कोणीकडे श्रीमती ! । तो प्राणप्रिय कज्जलोपम तुझा कोणीकडे गे ! पती ! ।। श्रेष्ठे! तूं वससी तथापि न तया सोडोनि एक क्षण । पातिव्रत्य भलें, भला तव असे संस्तुत्य हा सद्गुण ॥ ८ ॥ त्वत्तेजें जग हे विनिर्मित असे, तें तबले चालतें। जीयन वृक्षाचें न तयाविणे लघु असे गे! पत्रही हालतें ।। हा सिद्धांत करोनि शोध वदती पातालविद्वज्जन । देवी ! सत्य असेल तें जर, तुला माझें असो वंदन ! ।। ९ ।। अर्पोनी धरणीस योग्य समयीं जें जीवना निर्मल | संरक्षी वरमेघमंडल तुझें तें गे ! निवासस्थल ॥ नान्या अद्भुतशक्ति गे तुजसमा लोकत्रयीं शोधितां । सांगायास नको फिरोनि तुज हे त्वन्नाम विद्युल्लता ॥ १० ॥ पद्यामाजि लिहोनि सत्कविवरा ! म्यां पोतका! भाव हा ।। विद्वत्सन्नुत पूज्य कोकिलमुखें सांगावयाचें महा ।। केलें साहस आज धैर्य धरुनी हे बुद्धिमंदें खरें। चित्ता आवडले कळेल तुझिया वाटेल तेव्हां बरें ॥ ११ ॥ PRINTED and published by Janardan Mahadeo Gurjar at JAVA DADAJI'S "NIRNAYA-SAGARA" PRESS, Bombay. UTA