या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केरळकोकिळ. पु०१३ desorts[अ०६ SR ब्याजर. rani सर्व चतुष्पाद प्राण्यांमध्ये कोल्हा हा मोठा धूर्त व कावेबाज गणला जातो. ह्मणूनच 'विष्णुशाने' व 'इसापाने त्याजवर अनेक कल्पित गोष्टी रचून त्याचा गुण जगजाहीर करून सोडला आहे. ब्याजरचा आकार कोल्ह्यायेवढाच असून तो कावेबाजपणांतही त्याचीच बरोबरी करणारा आहे. ह्याच्या अंगावर लोंकर, व नखें तीक्ष्ण असल्यामुळे आपल्या देशांत ह्याला कोठे कोठे 'अस्वली डुकर' असेंही ह्मणण्याचा प्रघात आहे. ब्याजर हे जनावर ठेंगणे असून त्याची पाठ बसकी-अतिशय रुंद, व आंग सारें थलथलित असते. त्यामुळे चाही पायांवर शरीराचा सारा भाग जणूं काय ऑथबल्यासारखा दिसतो. सान्या शरीराची ठेवण साधारणपणें अस्वलासारखीच जवळ जवळ असते. तोंडाचा भाग लांबट असून शेवटास अगदीच निमुळता असतो. जाभाड भक्कम आणि दांत अतिशय तीक्ष्ण असतात. पुढच्या पायांस लांब लांब नखे असून त्यांच्या धारा तीव्र असतात. त्याचे केंस सडक असून पोटाकडच्या भागापेक्षा वरचा भाग अधिक तुकतुकीत दिसतो. शेपूट लांडे परंतु केसाळ असते. हे जनावर चालतांना अगदीं रेंगाळत रेंगाळत चालत असल्यामुळे त्याचा हेंगाडेपणा तेव्हांच दृष्टोत्पत्तीस येतो.