या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१२२ केरळकोकिळ, पुस्तक १३ वें. हा प्राणी आशिआ, युरोप, आणि उत्तर अमेरिका ह्यांतील समशीतोष्ण प्रदेशांत साधारणपणे सर्वत्र आढळून येतो. फ्रान्समध्ये तर ह्याची अगदी रेलचेल आहे. तो घनदाट अरण्यांत एकांतवासांत राहतो. तो आपणांस राहण्यासाठी जमिनींत एक विवर तयार करून त्यास पुष्कळ वाटा राखून ठेवतो. पाहिजे तेव्हां पाहिजे तिकडून पळतां यावे, किंवा लपून बसतां यावें ह्मणून त्या विवरांत जाळे विणल्याप्रमाणे आडवे तिडवे अनेक लहान लहान फांटे फोडून ठेवतो. हे विवर कधी कधी अतिशयच लांब केलेले असते. ह्याचा सर्व व्यापार बहुधा रात्री चालतो. त्याला सर्व त-हेचे लहान लहान प्राणी खावयास चालतात. मग ते चतुप्पाद असोत, पक्षी असोत, सरपटणारे असोत, की कीटक असोत. सारे सरशहा सारखेच. शिवाय, हे बुवा कंद, मूळे, फळे व मध ह्यांजवरही ताव मारावयास चुकत नाहींत. हा प्राणी इतका खादाड आहे की, त्यास खावयास ब्रह्मांड सुद्धां पुरावयाचें नाहीं! पाहिजे तितक भक्ष्य मिळा, ह्याच्या ताडाला खळ ह्मणून कसला तो नाहींच. वीट, व अजीर्ण ह्या दोहोंचा त्या बिचाऱ्याला संस्कार सुद्धां परमेश्वराने ठेवला नाही! आणि ह्यावरूनच त्याचे कित्येक ठिकाणी 'ब्रह्मांडभक्षक' असें नावच पडून गेले आहे. पवार, TEST कहा जसा खादाड आहे, तसाच तो काटकही पण आहे. अन्नपाण्याचा टिपूस नसतांही ह्याला किती तरी दिवस राहतां येते. अशा प्रकारे अठेचाळीस दिवसपर्यंत उपाशी ठेवून लोकांनी अनुभव पाहि लेला आहे. आणि त्यांतही चमत्कार हा की, खावयास मिळेपर्यत अन्नपाण्याविना सुकलेल्याचे काहीही चिन्ह त्याच्या शरीरावर दिसून यत नाही. हा प्राणी अतोनात कावेबाज व धूर्त असल्याने तो सांपळ्यात ह्मणून कधी सांपडावयाचाच नाही, इतकें त्याच्या अंगी विलक्षण चातुय असते. ते आपल्या विवरापासून फारसें दूर जात नाही, पण तितक्यातनही दूर गेलेच, व त्यावर हल्ला आलाच तर, हे जनावर प्रतिस्पध्याशा अलोट धैयोने टक्कर मारतें. कुत्र्यांनी पाठलाग केला तर त्याचे पाहल बचावाचे कलम मटले ह्मणजे बिळांत घुसावयाचे. तेथे बहुधा त्यास कोणाचीही भीति रहात नाही. तितक्यांतूनही बीळ लांब राहून ती संधि साधली नाही, तर ब्याजर हा शत्रूशी मरेपर्यंत लढतो. पण हा जसास नसतांही यात उपाशी की, खाव धूत असल्याने तो असते. ते आपल्याचाच नाही.