या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१२४ केरळकोकिळ, पुस्तक १३ वें. नेश्वरांचे अंतःकरण, तें गुरुभक्तीने आधीच दाटलेले, त्यास, भगवद्गीतेच्या तेराव्या अध्यायांतील (श्लो० ७) 'आचार्योपासनं ' पदरूप चंद्राचे अकस्मात् दर्शन झाले. मग काय विचारावें ? 'आर्टिशियन वेल'च्या निर्मल कारंजाप्रमाणे त्यांच्या भक्तिप्रेमामृताचा प्रवाह उसळी घेऊन एकदम बाहेर पडला, आणि त्याने श्रोतृसमाजास गारीगार करून सोडले. ह्या एका पदावर मूळ ओव्या ९१ आहेत. तें अपूर्व भक्तिरसामृत यथाशक्ति आर्यापात्रांत भरून आज परमादराने रसिक जनांस अर्पण करित आहों. त्याचा रसास्वाद घेऊन रुचीचा पयोय कळविण्याविषयी कोकिळाची अगत्यपूर्वक विनंती आहे. अशा विषयांत अनुप्रास, यमकें इत्यादि शब्दालंकारांचा समावेश फारसा होत नसल्यामुळे, साधे. पणाचीच शोभा स्वीकारावी लागते, हेही रसिकवर्यास सांगणे नको. ही सेवा मानवल्यास दुसरे प्रकारही हळूहळू पुढे येतील. -ए० के० को०आर्या. (ज्ञानेश्वरीतून.) "श्री ज्ञानेश्वररने यत्ने गीता करूनियां मथन । दिधली सुधा बुधांप्रति करितों 'गुरुभक्ति' त्यांतली कथन ॥१॥ बोले प्रसन्न चित्तें भगवान् श्रीकृष्ण जो जगत्त्राता। चतुरश्रेष्ठा पार्था देउनियां लक्ष्य आयकें आतां ॥२॥ प्राणाहुनि आवडली न विसंबें जीस मीहि एक घडी। ती तुज गुरुभक्ति सख्या सांगतसें मी करूनियां उघडी ॥३॥ गुरुसेवा अवघ्याही भाग्यांची जन्मभूमि अवलोकीं। ब्रह्मस्वरूप करितें जीवांना मग्न जाहल्या शोकी॥ ४ ॥ ते गुरुसेवामृत तुज देतो त्याची पुनः पुन्हा चव घे। प्रथम करी कार्य परी ऐकें हें चित्त देउनी अवघे ॥५॥ जलसंचय घेउनियां गंगाही सागराकडे धावे । किंवा श्रुतिसंघ जसा ब्रह्मपदी शीघ्र जाउनी पावे ॥६॥ जमवुनि पंचप्राणां बसवुनियां आदरें खगुणरत्नीं। अर्पण करिते प्रेमें जैशी पतिला पतिव्रता पत्नी ॥७॥