या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ६ वा. जून १८९९ तैसें अंतर्बाह्यहि अपुलें सर्वस्व गुरुकुळां वाहे । भक्तीचे आवडतें मंदिर होवोनि जो स्वयें राहे ॥ ८॥ विरही स्त्रीला दिसतो निशिदिनि पतिचाच राहता देश । अशनी शयनी नयनी इतराचा भासही नव्हे लेश ॥ ९ ॥ तैसें गुरुसदनाला ज्या देशे करुनि ठेविलें जतन । हाधारी निजहृदय त्याच देशां दिधलें ज्याने करूनियां वतन ॥ १० ॥ तिकडुनि वारा येतां सामोरा जावया त्वरें धावे । साष्टांग नमुनि बोले 'माझ्या सदनीं प्रभो चला यावें ॥ ११ ॥ वेड्यासमान दिसतो प्रेमभराच्या मुलींत राहोनी ।शा बोलावयास आवड गुरुच्या देशाकडेच पाहोनी ॥ १२ ॥ भ्रमतो भक्तिभरांतचि न सुचे ज्याला कधीच घरदार । अपुल्या जिवास करितो गुरुसदनी अढळचा वतनदार ॥ १३ ॥ दावें लावुनि वत्सा बांधुनि गोठ्यांत ठेविती जैसें । तैसा देहग्रामी आज्ञा गुरुचीच घेउनी बैसे ॥ १४॥ बिरडे निघेल केव्हां स्वामी भेटेल केधवां ह्मणतो । अति चंचल निमिषाला थोर मनीं जो युगाहुनी गणतो॥ १५ ॥ गुरुकडुनि येत कोणी किंवा कोणास धाडिलें गुरुंनीं । मरणोन्मुखासि येतां जीव जसा तो भरे सुखें करुनी ॥ १६ ॥ किंवा मोड सुके त्या अमृताचा रस बळेंचि पाजावा ।। अथवा सोडुनि डबके मत्स्य जसा सहज सागरी जावा ॥ १७ ॥ किंवा ठेवा मिळतां रंक जसा सौख्यसागरी लोळे । किंवा जन्मांधाला दैवें यावेत पाहते डोळे ॥ १८ ॥ भिक्षत जन्म गेला ज्याच्या मागें सहस्रशा विपदा ।मल ऐसा शुद्ध भिकारी न्यावा दैवें क्षणांत इंद्रपदा ॥ १९ ॥ तैसा गुरुकुलनामें फुगतो बहु अनुपमेय सुखभारें। वाटे आकाशचि हे जाइल त्याच्यांत आटुनी सारे ॥२०॥