या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केरळकोकिळ, पुस्तक १३ वें. ऐशी गुरुकुळभक्ति आवड ज्याला खरोखरी वरिते। ध्यानांत ठेव त्याची आनंदें ज्ञान चाकरी करितें ॥ २१ ॥ गुरुमूर्ति रम्य सुखदा अंतःकरणांत आणुनी नेमें। ध्यानीं धरूनि दृढतर सेवन करि जो बहू बहू प्रेमें ॥ २२ ॥ निजहृदय शुद्धजागी स्थापुनि आराध्य देव गुरुमूर्ति । होउनि सेवकभावे करुनी घेतो स्वकामनापूर्ति ॥ २३ ॥ किंवा ज्ञानागारी प्रतिमा आनंदमंदिरी गुरुची । ती ध्यानामृते तियेला अभिषेकुनि घेत एक एक रुची ॥ २४ ॥ बोधाके उदय होतां सन्मतिपात्रांत सत्त्वतरुसुमनें । भरुनी शिवगुरुला जो लाखोली वाहतो सदा सुमनें ॥ २५ ॥ शुद्ध त्रिकालसमयीं जीवदशारूप धूप जो जाळी NP जो ज्ञानदीप लावुनि भावें गुरुला सदैव ओंवाळी ॥ २६ ॥ ऐक्याचा पाक करुनि भावें नैवेद्य अर्पितो नित्य । प्रतिमा करुनि गुरुतें पूजेचा होतसे स्वयें भृत्य ॥ २७ ॥ किंवा करितो शय्या प्राणाची मानुनी गुरु स्वपती । भनि भोगी यथेष्ट चित्तें प्रेमानंदें भरूनि शुद्धमती ॥२८॥ कोणा एका वेळी प्रेमाचे फार येतसे भरतें। तेव्हा चित्त तयाचें गुरुला क्षीराब्धिही पहा करिते ॥ २९ ॥ गुरुध्यान सौख्यशय्या शेषासम कल्पुनी तयास्थानी। गुरुरूप शेषशाई त्यावरि निजला कधी कधी मानी ॥ ३०॥ लक्ष्मी वयेंचि तेथे होतो जो पादपद्म सेवाया। पुढती उभा रहाया गरुडहि कल्पी स्वयेंचि त्या ठाया ॥ ३१ ॥ नाभीपासुनि जन्मे ब्रह्मा होवोनि तो स्वयें थारे । कालान ध्यानसुखानुभवातें ऐसा जो घेत मानसद्वारें ॥ ३२॥ केव्हां गुरुही माता ऐशी चित्तांत कल्पना घोळे । स्तनपान करित हर्षे शिशु होउनि जो तिच्यावरी लोळे ॥ ३३ ॥