या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१२८ केरळकोकिळ, पुस्तक १३ बें. ऐशी करीन सेवा गुरुभक्तीचा धरूनि एक पथ । गुरुच्या कृपे करूनी ऐशी मी वाहवीन की शपथ ॥४७॥ 'ठेवीन एकनिष्ठा अन्याला मी कधीं न पाहीन । प्रेमाने धरुनि तुला जवळ तुझ्या मी सदैव राहीन' ॥४८॥ श्रीगुरुच्या अनुरागा पाडुनियां सर्वथैव मोहास । AR लावीन एक पत्नी-व्रत पाळाया तयास मी खास ॥ ४९ ॥ करिन प्रसाद तुजवरि नाहीं वळणार खास अन्यास । गुरुच्या लोभा करवी करविन ऐसा परार्थ सन्यास ॥ ५० ॥ (पुढे चालू.) SBE राजयोग. प्रकरण आठवें. गरमा योगतत्व. TRICTीमा (हे राजयोगाचे सार कूर्मपुराणांतून भाषांतर करून काढलेले आहे.) मनुष्याच्या भोवती असणारा पातकपंजर योगाग्नि दग्ध करून टाकता. ज्ञान निमेल होते, आणि तत्काल निर्वाण प्राप्त होते. योगापासून ज्ञान मिळते, आणि तेच ज्ञान फिरून योग्याला सहाय्य करत. ज्ञान आणि योग ह्या दोहोंमध्येही जो पारंगत असतो, त्याजवर इश्वरही सतुष्ट असतो. जे दिवसांतन एकदां, दोनदां, तीनदा किवा निरंतर महायोगाचा अभ्यास करतात. ते देव आहेत असे समजाव. योगाचे प्रकार दोन आहेत. एकाला 'अभाव' असें ह्मणतात, व दुसज्याला 'महायोग असे ह्मणतात. एखाद्याचा आत्मा निर्गुण-शून्य मानन त्याचे ध्यान करणे, ह्याला अभाव असें ह्मणतात. योगी प्रत्येकापासून आत्म्याची ओळख करून घेतो. एखाद्याला आत्मा ज्यामध्ये आनंदाने परिपूणे आणि सर्व किल्मिषापासून मुक्त असा दिसतो, आणि परमेश्वराशी तद्रूप होतो त्याला महायोग असें ह्मणतात. इतर