या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ११ वा. नोवेंबर १८९८. २५१ बोलला:-"माझा ज्या वेळी भरभराटीचा काल होता, त्या वेळी मी हे सर्व करून चुकलों. मला आता हात देणारा कोणीही नाहीं; तथापि मी जी काय दोन दाने केली, ती तरी माझ्या अंतकाळच्या यातनेंत, माझ्या आत्म्यास 'सुखशांति' देतील." त्यानंतर त्याने एकदां 'दगोबा'कडे नजर फेंकून प्राण सोडला. ही गोष्ट इ. स. १४० व्या वर्षी घडली. अंतकाळचे त्याचे शब्द असे होते. "मी बौद्धधर्मोपाध्यायांचा बंदा गुलाम आहे." असो. दुत्तुगिसुनूच्या मागून त्याचा भाऊ सैदैलिस हा गादीवर बसला. त्याने रुहण येथें राज्य करीत असतां, यतारप्रांतांत मलिगरिंगलनामक विहार' बांधिला. त्याने आपल्या राज्यारोहणानंतर रुनवेलीचा 'दगोबा' कडेवर नेला, आणि पुष्कळ सरोवरें बांधिली. ह्याच्या मागून जे राजे. गादीन्शीन झाले, त्यांच्या कारकीदीत महत्वाच्या गोष्टी मुळींच घडून आल्या नाहीत, मटले असतां चालेल. या (पुढे चालू.) वेदांतपर संवाद. गृहस्थ-आलीकडे येरे धाकट्या मुला. मुलगा-कशाने थोरपणा आला तुला? गृहस्थ-इवलेसें किरे दिसते पोर. मुलगा-ब्रह्मीं नाही लहान थोर. गृहस्थ-ब्रह्म तुला ठाउक आहे? मुलगा--सर्वां घटीं तूंच पाहें. गृहस्थ-ब्रह्मीं नाहीं भेदाभेद ? १ वेंगुर्ले मुक्कामीं वे. रा. रा. पुरुषोत्तम सीतारामबुवा पुनाळेकर या नांवाचे एक हरिदास आहेत. हे मोठे रसिक आणि प्रेमळ आहेत. ते आपल्या कीतेनांत केरळकोकिळांतील' पद्यं वगैरे ह्मणून मोठी करमणूक करितात. सदरहू बुवांचे काही वेदांतपर संवाद आहेत. ते मोठ मजेचे आहेत. त्याचा थोडासा भासला आह्मी आपल्या वाचकांसही आज सादर करीत आहों.