या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ६ वा. जून १८९९. १२९ ज्या ज्या योगांविषयी आपण ऐकतों व वाचतों ते हा जो श्रेष्ठ महायोग किंवा ब्रह्मयोग त्याच्या पासंगासही लागावयाचे नाहीत. ह्या योगामध्ये योग्याला आपण स्वतः व सर्व जग ईश्वरस्वरूपच दिसू लागते. ह्मणून हा योग सर्व योगांत श्रेष्ठ होय. राजयोगाच्या पायऱ्या इतक्या आहेतः-यम, नियम, आसन, प्राणायाम, धारणा, आणि समाधि. त्यांत कोणाचीही हिंसा न करणे, सत्यावर निष्ठा ठेवणे, निस्पृहता बाळगणे, सद्वर्तनाने राहणे, परिग्रह घेणे ह्यांना 'यम' असें मणतात. ह्याच्या योगानें मन किंवा चित्त शुद्ध होते. कायावाचामर्नेकरून निरंतर आणि कोणत्याही प्राण्याला पीडा न करणे ह्याला 'आहिसा' असें ह्मणतात. अहिंसेपेक्षां श्रेष्ठ असा कोणताच सद्गुण नाही. कोणत्याही जिवाला उपद्रव न देणे ह्या गुणापासून जे सौख्य प्राप्त होते त्यापक्षा मोठे सौख्य दसरे कोणतेच नाही. सत्याच्या योगानें आप-. णास व्यवहार चालवितां येतो; सत्याने प्रत्येक वस्तु प्राप्त होते; सत्यांत सर्व कांहीं भरलेले आहे. घडलेल्या गोष्टी जशाच्या तशा सांगणे ह्याचे नाव सत्य. दुसऱ्याचा माल चोरून किंवा बलात्काराने न घेणे, ह्याचें नांव अस्तेय किंवा निर्लोभता. मनांत, बोलण्यांत आणि कृतींत सदासर्वकाल काणत्याही स्थितीत एकनिष्ठ असणे ह्याचें नांव ब्रह्मचर्य. कोणापासून कोणतीच देणगी-महत्संकटांत असतांही-न घेणे ह्याचें नांव परिग्रह. एखाद्या मनुष्याने दुसऱ्यापासून कोणतीही देणगी घेतली, तर त्याचे मन कलुषित होते; त्याचे वजन कमी पडते; तो आपली स्वतंत्रता गमावतो; आणि तो दुसन्याचा ताबेदार होतो. योगसिद्धीला खालच्या पाटा साह्यकारी आहेतः-नियम-नियमसूद व्यवहार व आचार; तपस्, सदाचरण, स्वाध्याय-किंवा अभ्यास, संतोष-किंवा समाधान; शौचम्-पवित्रता; आणि ईश्वरप्रणिधान-किंवा ईश्वरी पूजन; उपोषणे करून किंवा दुसऱ्या कोणत्याही रीतीने शरीरास दंडण करणे ह्याला शारीरिक तप असें ह्मणतात. वेदांचे आणि इतर मंत्रांचे अध्ययन करणे ह्याला अभ्यास किंवा स्वाध्याय असें ह्मणतात. ह्याच्या योगाने शरीरांतील सत्वांश पुनीत होतो. हे मंत्र पठण करण्याचे तीन प्रकार आहेत. एक उच्च स्वराने, एक हळू आणि एक मनांतल्या मनांत. उच्च स्वरात-कवा