या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ६ वा. जून १८९९. तील अत्यंत पवित्र मंत्र होय. त्याचा अर्थ:-"हें ब्रह्मांड ज्याने निर्माण केले, त्या प्रभूच्या सामर्थ्याचे आमी ध्यान करतो. तो आमची मनें सुप्रभ करो." नंतर त्याच्या आरंभाला व शेवटाला 'ॐ' हे जोडावे. एका प्राणायामांत तीन वेळ गायित्रीमंत्र जपावा. सर्व ग्रंथांमध्ये प्राणायामाच्या तीन कृति सांगितलेल्या आहेत. (१) रेचक ह्मणजे उच्छ्रास किंवा वायु बाहेर सोडणे. (२) परक ह्मणजे श्वास किंवा वायू आंत घेणे. आणि (३) कुंभक मणजे वायु आंत दाबून धरणे किंवा स्थिर ठेवणे. कर्मेंद्रिये आणि ज्ञानेंद्रियें बाह्य व्यापार करीत असतात आणि त्यांचा बाह्य पदार्थांशी संबंध असतो. त्यांना आपल्या इच्छेच्या ताब्यांत आणणे ह्याचें नांव प्रत्याहार. इंद्रियांना अंतर्मुख करणे हा त्याचा शब्दशः अर्थ आहे. हृदयकमलावर किंवा मस्तकाच्या मध्यबिंदूंत मन निश्चल ठेवणे, बाला 'धारणा' असें ह्मणतात. मनोलहरी उचंबळतात तेव्हां एका स्थानावर राहून, एकाच स्थानाचा पाया करून दुसऱ्या कोणत्याही लहरास स्पर्श न करितां-इतर लहरी शांत होऊन मनामध्ये एकच लहर उठणं ह्याला 'ध्यान' किंवा एकाग्रता असें ह्मणतात. पायाची मुळीच आवश्यकता न राहतां सारें मन एकच लहरीमय-एकच खरूप-तदाकार होणे ह्याला 'समाधि' असें ह्मणतात. कोणत्याही स्थानांच्या किवा चक्रांच्या मदतीशिवायच पदार्थाचें ज्ञान झालें, एकाच स्थानावर बारा सेकंदपर्यंत मन निश्चल राहिले, तर ती धारणा झाली. अशा धारणा बारा झाल्या ह्मणजे एक ध्यान होते. आणि अशी ध्याने बारा झाली ह्मणजे एक समाधि होते. नंतर आसन ह्मणजे मुद्रा. ह्यामध्ये शरीर सरळ कसें धरावें ? छाती, खांदे, व मस्तक ह्यांच्यापासून शरीर मोकळे कसे ठेवावें ? येवढीच ध्यानात ठेवावयाची गोष्ट आहे. जेथे विस्तव असेल, जेथे पाणी असेल, किंवा जमिनीवर पालापाचोळा पडलेला असेल, किंवा जेथें हिंसक पशु असतील, जेथें चार रस्ते एकत्र होऊन चव्हाटा झाला असेल, अथवा जेथे अतिशय गोंगाट असेल, किंवा अतिशय भयाण प्रदेश असेल किंवा जेथे अतिशय वारुळे वाढलेली. असतील, अथवा जेथें अनेक दुष्ट लोक असतील, अशा ठिकाणा योगाभ्यास करूं नये. हे सर्व विशेषतः हिंदुस्थानाला लागू आहे. शरीर