या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

केरळकोकिळ, पुस्तक १३ वें. १३२ अधिक सुस्त-जड-वाढू लागेल, अथवा मन जेव्हां दुःखी कष्टी असेल, तेव्हां अथवा शरीर व्याधिग्रस्त असेल तेव्हां, अभ्यास होत नाही. जेथे चांगला एकांत आहे, आणि जेथे लोक व्यत्यय आणणार नाहीत, अशा स्थळी बसा. आपण काय करतो आहों तें लोकांस जितकें जितकें तुझी न कळवाल, तितकें तितकें त्यांत वैलक्षण्य उत्पन्न होईल. पण आपण जर भर वस्तींत गेलों, आणि आपण काय करतो ते लोकांस कळण्याची इच्छा धरली, तर मुळीच कार्य होणार नाही. अमंगल स्थले कधीच पसंत करूं नयेत. थोडीशी रमणीयता असेल असें स्थळ पहावें. किंवा आपल्या घरांतीलच एखादी बरीशी खोली पसंत करावी. अभ्यास करूं लागण्याच्या वेळी आधी प्राचीन योग्यांना वंदन करावें, तसंच आपल्या गुरूला व परमेश्वरालाही वंदन करून मग योगाभ्यासास लागावें. ध्यानाविषयी सांगतांना, एखाद्या स्थळी चित्तैकाग्र्य कसे करावे, ह्याची थोडीशी उदाहरणेही दिली आहेत. सरळ बसावें, आणि आपल्या नासिकाग्रावर दृष्टि ठेवावी, ह्मणजे हळूहळू मनाची एकाग्रता कशी करावा तें समजू लागेल. नेत्रांस जोडलेल्या ज्ञानतंतूंवर एकवार ताबा बसला ह्मणजे प्रतिक्रियामंडलावर व त्याबरोबरच इच्छेवरही सत्ता चालावण्याची तयारी कशी ठाम होते, ह्याचे विवेचन पुढे करण्यांत येईलच. ध्यान करतांना जी कांहीं कल्पित चित्रे आपल्या मनापढें धरावी लागतात, त्यांचा मासला दाखऊं. उदाहरणार्थः-मस्तकाच्या वरच्या भागावर कांहीं अंगुळे सोडून एक चक्र आहे अशी कल्पना करा. सगुण हा त्याचा गाभा, आणि ज्ञान हा त्याचा देंठ होय. आणि यागाच्या आठ शक्ति ह्या त्या कमळाच्या आठ पाकळ्या होत. त्याग ही त्यातील स्त्रीपुंकेसर. योग्याने बाह्यशक्तींचा त्याग केला की, तो मुक्ता पोचतो. ह्मणून कमलाचीं अष्टदळे ह्याच आठ शक्ति आहेत. परतु आंतील स्त्रीपुंकेसर हे पूर्णत्याग होत. ह्मणून त्यांचा त्याग करणे ह सर्वखाचा त्याग करण्यासारखे आहे. त्या कमळाच्या आंत सर्वसमथ, निराकार परमेश्वराची सुवर्णमय प्रतिमा आहे. तिचे नांव"ॐ".ती अनिर्वाच्य व दैदीप्यमान तेजासहवर्तमान असते असे मानून तिच्यावर एकाग्रता करावी. दुसरेही एक ध्यान सांगितलेले आहे. आपल्या हृदयांत एक पोकळी हाय. आठ पाक . योग्याने पोचतो