या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ६ वा. जून १८९९. १३३ आहे असे समजा. आणि त्या पोकळीमध्ये एक ज्योत पेटलेली आहे अशी कल्पना करा. ती ज्योत हाच आपला आत्मा आहे असेंही गृहित धरा. त्या ज्योतीमध्ये आणखी एक तेजोमय पोकळी आहे अशीही कल्पना करा. तोच तुमचा परमात्मा किंवा ईश्वर होय. त्या हृदयस्थावर एकाग्रता करा, त्याचें ध्यान करा. . NET सदाचार, अहिंसा, प्रत्येकावर-कट्टया शत्रूवर सुद्धां-क्षमा, सत्य, ईश्वरनिष्ठा, ह्या सर्व निरनिराळ्या वृत्ति आहेत. त्या सर्वात परिपूर्णताप्राप्ती झाली नाही, तरी भिऊ नका. प्रयत्न करा ह्मणजे बाकी सर्व प्राप्त होतील. ज्याने साऱ्या भीति, सारा क्रोध, साया आसक्ति सोडल्या, ज्याने आपला आत्मा ईश्वरास अर्पण केला; जो ईश्वरापासून निघत नाहीं; ज्याचे अंतःकरण निर्मल झाले; ज्याची इच्छा काय ती ईश्वराविषयींचा त्याला परमेश्वराचा प्रसाद होईल. ह्याकरितां ज्ञानमार्गाने त्याची उपासना करा, की भक्तिमार्गाने त्याची उपासना करा, किंवा सवसंगपरित्यागाने त्याची उपासना करा, कशीही करा. "जो कोणत्याही जीवाचा मत्सर करित नाहीं; जो सर्वांचा मित्र; जो सवावर दया करणारा: स्वार्थ ह्मणून ज्याला काहीच नाहीं; ज्याचा आभमान लयास गेलेला; तोच माझा आवडता भक्त व तोच माझा आवउता उपासक. जो सदासर्वकाल. योगाभ्यास करतो; जो आपल्या अहंभावास ताब्यात ठेवतो; ज्याची इच्छा निश्चल झाली; ज्याने मन व बुद्धि मजमध्ये अर्पण केली; तोच माझा परम प्रिय भक्त, हे लक्ष्यांत ठेव. जो स्वतः कधी त्रास देत नाहीं; व दुसऱ्याच्या त्रासाला कारण होत नाही; हर्षे, शोक, भीति, व इच्छा ह्यांचा अतिशय ज्याने सोडून दिलेला; असा जो कोणी असेल तो माझ्या गळ्यांतला ताईत. जो कशावरच अवलंबून राहत नाहीं; जो पवित्र; निरलस; सर्वसंगपरित्याग केलेला; जो दुःखी ह्मणून कधीच होत नाहीं; संपत्ति येवो की विपत्ति येवो तरी ज्याला पर्वा नाहीं; कोणी स्तुति करो की निंदा करो, दोहोंतही जो सम; शांत; व मनांत विचार करणारा, आपल्या मार्गात जे काय थोडे बहुत प्राप्त होईल, त्यांतच आनंदी. घर नसल्यामुळे जो शून्यगृही; सारे जग हेच ज्याचें घरः ज्याचे विचार अढळ; असा जो काणा असेल, तोच योगी होतो."