या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ६ वा. जून १८९९. १३६ घेतले पाहिजेत. नंतर तुझा उद्धार होईल." तेव्हां तो मनुष्य मोठ्या आनंदाने नाचूं उडूं लागला. आणि ह्मणाला “एकून इतक्या लौकर माझी सुटका होणार तर!" इतक्यांत आकाशवाणी झाली की "माझ्या मुला! तुझा ह्या घटकेलाच उद्धार केला आहे." हेच त्याच्या धीराचें वक्षीस होते. इतके जन्म तो आपले कर्तव्य करावयाला तयार होता. त्याचा धीर खचला नाही. पण पहिल्या मनुष्याला चार जन्मच अधिक वाटले. त्या मनुष्यासारखी अंगांत हिंमत धरून युगेंच्यायुगें घालविण्यास जो खुषी असतो, त्यालाच अत्यंत श्रेष्ठ फल प्राप्त होते. FA पस्तकपरीक्षा. दुर्दैवविलास अथवा पानपतच्या युद्धाचें आर्याबद्ध वर्णन-हे सरस काव्य के० रा. रा. बापूजी लक्ष्मण कुळकरणी, कारकून व शेखदार संस्थान विचूर, ह्यांनी रचून छापून तयार केलें; व पुस्तकें बांधवून आल्यावर त्यांतील एक प्रत घेऊन प्रत्यक्ष आझांस भेटावें, इतकी त्यांची केरळकोकिळा 'वर निष्ठा किंवा पूज्यबुद्धि होती. परंतु दुर्दैवा' में श्री. भाऊसाहेब पेशव्यांस जसा आपला 'विलास' दाखविला, त्याचप्रमाणे प्रस्तुत कवीस व त्यांच्या मित्रादि इष्ट आप्तांस दाखवून मृत्युलोकची स्मृति ताजी करून दिली ! ह्मणजे सदरहु आमच्या प्रेमळ कवीस, त्याच्या हातांत बाइंडिंग झालेले पुस्तक पडण्यापूर्वीच प्लेगनें इहलोकांतून उचललें ! ! ह्यास्तव त्यांच्या हेतूप्रमाणे त्यांच्या काव्याची ही एक प्रत, त्यांचे बालमित्र, अन्नदाते, रसिकाग्रणी व गुणज्ञ, पहिल्या प्रतीचे सरदार, फर्स्टक्लास माजिस्ट, विंचूरसंस्थानाधिपति असे श्रीमंत गणपतराव माधवराव ऊर्फ आबासाहेब विंचूरकर ह्यांनी आमच्याकडे कृपा करून पाठविली, व तिच्या सोबतच आपल्या सत्कविमित्राचें करुणास्पद निधनवृत्तही आह्मास अत्यंत आदराने कळविण्याची मुद्दाम तखलिप घेतली आहे. त्यावरून अनेक गोष्टी ग्रहण करण्यासारख्या असल्यामुळे त्या पत्रांतील काही भाग आमच्या वाचकांस आझी सादर करण्याची आज येथे परवानगी घेतो. श्रीमंत लिहितातः "सा. न. वि. वि. आपला माझा प्रत्यक्ष परिचय नाहीं तथापि आपले गुणांस मी पूर्णपणे ओळखत आहे.......... माझे पदरीं श्रीनरसिंहकृपेनें चार चांगली वाईट माणसें आहेत, त्यांत बापूजी लक्ष्मण कुळकरणी ह्या नावाचा एक