या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१३६ केरळकोकिळ, पुस्तक १३ वें. कारकून होता. तो माझा लहानपणापासूनचा स्नेही असल्याने त्यास मी पदरींच बाळगले होते. त्यास कविता करण्याचा नाद असल्याने व फार दिवसांच्या सहवासाने त्याच्या व माझ्या दरम्यान फारच प्रेम जमून एकमेकांस एकमेकांवांचून क्षणभरही करमत नसे. तो घरचा फार गरीब असल्याने त्यास आपली कृति जगापुढे आणण्यास संधि आली नाही. ती संधि यावी ह्मणून मी त्यास पुष्कळ प्रकारे मदत करून त्याचे ग्रंथ कांहीं छापविले. त्यांपैकी "वृंदावनविहार" नावाचे पुस्तक आपणांकडे अभिप्रायास आले होते. शिवाय, " श्रीरामचंद्रोत्सवचंद्रिका" नांवाचे पुस्तकावरही आपला अभिप्राय आला होता. याशिवाय त्याने नाटके वगैरे पुष्कळ तयार करून ठेविली आहेत. परंतु ती छापण्याची संधि अनेक अडचणीमुळे त्यास मिळाली नाही. त्यांतून पानपतच्या लढाईचे आर्याबद्ध वर्णन त्याने केलेले मी छापविले. त्या वेळी त्यास आपली साधारण कृति आतां जगापुढे आली ह्याबद्दल फार आनंद झाला. परंतु दुर्दैव सारखें मागे लागल्यामुळे सदरहू माझा प्रिय स्नेही व आश्रित हा सुमारे दीडमहिन्यापूर्वी विंचूर येथील प्लेग. मध्ये मृत्यु पावल्याने त्याचे कुटुंबांतील माणसांवर व मजवर मोठा प्रसंग गुररला आहे. असो, ईश्वर ठेवील तसें राहणे भाग आहे, ही ह्मण मनांत आणून स्वस्थ आहोत. त्याच्या मागे आपण चिंताक्रांत बसण्याऐवजी त्याच्या कृति हळू हळू जगापुढे मांडून त्याचा कीर्तिरूप वृक्ष वाढीस लावणे हेच आपले कर्तव्य आहे असे समजून उद्योगास लागलो. त्याचे मनांत आपल्याकडे समक्ष येऊन वरील पानपतच्या युद्धाचे आर्याबद्ध वर्णन आपल्यास नजर करावें असें होत. परंतु तसे घडण्यास आतां मार्ग नसल्याने मी त्याच्या तर्फे आपणाकडे त्याची एक प्रत पाठवितो, हिचा आपण स्वीकार करून योग्य तो अभिप्राय आपल कोकिळात घ्यावा. सदरील पुस्तकाचा शेवटचा प्रफ त्याने स्वतः तपासून पाठविल्यावर सुमारे १०/१५ दिवसांनीच तो वारला!! असो. ईश्वर त्याच्या आत्म्यास सुखी ठेवो." रा० कुळकरणी हे मराठी आधुनिक कवींतील उत्तम कवि होते. ते अकस्मात् आझांस नाहसि झाल्यामुळे, व त्यांची अशी शोचनीय स्थिति झाल्यामुळे वरच्या पत्रावरून अंतःकरण सद्गदित होते हे तर खरेंच, पण त्याहूनही श्रीमंत आबासाहेब विंचूरकर यांच्या दीनवत्सलतेचा, रसिकतेचा, गुणग्राहकत्वाचा व सीम प्रेमाचा जो काही मनावर ठसा उमटतो, तो केवळ अपूर्व होय. आणि त्यावरून श्रीमंतांच्या ठिकाणी विलक्षण पूज्यबुद्धि उत्पन्न होते. असो. त्याबद्दल ।