या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ६ वा. जून १८९९. १३७ आतां विशेष कांहीं न लिहितां फक्त श्रीमंतांनी अशा सत्कवीची-व्यवसायबंधूचीखऱ्या मित्राची अत्यंत भक्तिभावाने ओळख करून देऊन त्याची कृति अर्पण करण्याची तसदी घेतल्याबद्दल फार फार उपकार मानून गतमित्रकवीच्या सत्कृतिपरिमळाचा लाभ आमच्या वाचकांसही देण्याची सुरवात करतो. प्रस्तुत कवीच्या एक दोन कृति-हणजे काव्ये-आमच्याकडे पूर्वी येऊन त्यांजवर आह्मीं अनुकूल अभिप्राय दिलेलाही 'केरळकोकिळ ' वाचकांस स्मरत असेलच. अर्वाचीन कवींमध्ये 'दुर्दैवविलास' कर्ते कै. रा. रा. बा. ल. कुळकरणी ह्यांचा नंबर पुष्कळच वर लागेल, ह्यांत तिळमात्र शंका नाही. त्यांच्या काव्यांत सुलभता आणि सरळता हे अगदी प्रधान गुण आहेत. शिवाय, उपमा, अलंकार, व उत्प्रेक्षा देण्याची शैली फारच तारिफ करण्यासारखी आहे. व तिचा मासला आह्मीं पूर्वीच्या त्यांच्या 'श्रीरावनवमीउत्सवचंद्रिका' नामक काव्यात दाखवूनही दिलेला आहे. यमकें, मुग्धप्रास, वीररस, प्रधान भाषणांताल प्रतिध्वनीप्रमाणे गर्जना करणारे शब्द इत्यादि योजण्याची हातोटी ही इतर गुणास शोभविणारी आहे. 'पानपतच्या युद्धांत' ही वीर व करुणा हे दोन रस, हृदयांत साक्षात् उभे राहून चित्तवृत्ति तन्मय करून सोडतात. पानिपतचा युद्धप्रसंग हा मूळचाच कथाभाग रम्य आहे. त्यांत चित्ताला द्रावणारे प्रसंग अनेक आहेत; व प्रस्तुत कवीने ती ती चित्रे अगदी यथातथ्य रेखल्यामुळे, त्यांची शोभा विशेषच आल्हादजनक झाली आहे. उदाहरणार्थ पुण्याची त्या वेळची चलती व भरभराट; रघुनाथरावदादांची तिमोरशावर स्वारी; भाऊंची व दादांची बाचाबाच; दत्ताजी शिंद्यांचें धारातीर्थी पतन; भाऊसाहेबाचा निश्चय; जाटाचा अवमान, युद्धाची खाणाखणी; बळवंतराव मेहेंदळे याचा मृत्यु व त्यांच्या पत्नीचें सहगमन; विश्वासरावाचा अंत व भाऊगर्दी; जनकोजीचा शोकदायक शेवट इत्यादि भाग मोठ्या बहारीचे उतरले आहेत. त्यांतील थोडासा मासलाही वाचकांस सादर न करतां अभिप्राय संपविणे उक्त नव्हे, ह्यास्तव त्या त्या प्रसंगांतील थोडथोड्या आर्या दाखल करतो. प्रथमतः मंगलाचरण किती प्रेमळ आहे पहाःप्रिय तुज रक्तसुमन, तें माझें मीं अर्पिलें, प्रभो, आतां । चिंता तुलाच माझी, त्राता तूं, तूंच बा. यशोदाता ॥ १ ॥ १ ह्या शब्दांतील श्लेष किती मजेचा आहे. १८