या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१३८ - केरळकोकिळ, पुस्तक १३ वें. यापरि हेतु असे बा ! " स्वदेशसेवा घडेल हे तूं तें,"। वरदान हेच, वरदा ! देउनि पुरवीं स्वभक्तहेतूतें ॥ २ ॥ वागीश्वरी ! भगवती! असशी तूं त्रिभुवनासही मान्या, ।। तव सामर्थ्य न अन्या, कोण सुधी तुज ह्मणेल सामान्या ॥ ३ ॥ आतां रसिकांस प्रार्थना: विबुधास हे विनवितो, " रसिकांनो या भवद्विनम्रास । - वाटे भवदुपमेशी योजावें खचित मधुर आम्रास ॥१॥ स्वीकारावा कोकिल, टाकावा अन्य, आम्र हे न करी; । आहांत तेवि बुधहो ! प्राकृतही ग्रंथ घेतसा स्वकरीं ॥ २ ॥ माधुयें आम्रावर पक्षी येती अनंत, हे प्रकट । सरस भवद्धृदय ह्मणुनि, येती ग्रंथहि तसे तुझां निकट ॥ ३ ॥ ह्यांतील उपमाचातुर्यही लक्ष्यांत घेण्यासारखे आहे. आतां पहिल्या पान वाविषयी दुःख अल्पायु केंवि केले, हाय विधे गाजि बाजिरायाला । अस्मत्पुण्यचि न, असें वीर शिरोरत्न बा जिरायाला ॥ १ ॥ ह्यावरून चार चार पांच पांच अक्षरांची यमकें साधण्याची कवीची साहजिक प्रवृत्ति असल्याचेही दिसून येईल. आतां पुण्यपत्तनवर्णन: सकलां शस्त्रास्त्रकला प्रिय होउनि भट्ट तेहि भट होती । विद्वज्जनां मिळे धन-मान, मणनि वेदशास्त्र बहु पढता ॥ १ ॥ नाना विलास भोग प्रिय त्या नानास सर्वदां असती,। तेणे उत्तम नर्तक-गायक-नर-कामिनी पुरीं वसती ॥ २ ॥ बहुमोल पाच हीरादिकरने चमकती जरी वसनें, । नवपुष्पहार गंधी तैलें करिती पुरींत दंग मनें ॥ ३ ॥ चित्रविचित्र फलांचे येती दृष्टीस सर्वदां ढीग, । ग्राहकसमाज भारी विशालमार्गीही होइना रीघ ॥ ४ ॥ तरुतळवटीं सुनिर्मळ जळ झुळझुळ वाहतां न पळहि टळे । सुंदर सुगंधपूरित पुष्पें, मकरंदही तयांत गळे ॥ ५ ॥ कारंजी सुमनोहर-जलाशयामाजि उंच बहु उडती । निर्मळ जळबिंदु गळति वाटे ही मौक्तिकेंच की पडती ॥ ६ ॥