या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२६२ केरळकोकिळ, पुस्तक १३ वें. मुलगा-ऐसें बोलती चारी वेद. गृहस्थ-तुझा भेद गळाला? मुलगा-सद्रूने बोध केला. गृहस्थ-बोध ह्मणजे कायरे गड्या ? मुलगा-आत्मस्वरूपी पाहीं रे वेड्या. गृहस्थ--इवलेसें पोर पर बाट मोठे! मुलगा-थोरपणा असून चाट खोटें. गृहस्थ--माझें काय चाट झाले ? मुलगा-ज्ञानामुळे गर्व आले. गृहस्थ-गर्व जाईल कैशापरी ? मुलगा-सद्गुरूचें दास्यत्व करी. गृहस्थ-सद्गुरुकृपा झाली तुला ? - मुलगा--कृपेवांचून बोलवेल मला ? गृहस्थ-सद्गुरुकृपा तुलाच झाली ? मुलगा-भूतमात्रे भरून उरली. गृहस्थ-धालेपण फार केलें. मुलगा-सद्गुरुसंगत घडली. गृहस्थ-संगतीने कोण तरले ? मुलगा-महापातकी उद्धरले. गृहस्थ-पहिला तो कोळ्याचा पोर. मुलगा-अजामिळ चोख्या मार. गृहस्थ-ऐसे किती तरले पोरा ? मुलगा-मिती नाही रे गव्हारा. गृहस्थ-तर कां इतके यमें नेले ? मुलगा-अविश्वासें बुडून मेले! गृहस्थ-विश्वास काय थोर झाला ? मुलगा-हा तो निश्चय पुराणी ठेला.