या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ६ वा. जून १८९९. १३९ धेनूंची खिल्लारें वत्सांचे कळप जाति मार्गानें। तैं तद्रक्षकबाळे वाजविती वेणु गाउनी गाणें ॥ ७॥ कोठे प्रातःस्मरण श्रवणीं ये वेदशास्त्र पठन कुठे,। माल कोठे वीणावादन, सुखर गायन, मृदंगनाद उठे ॥ ८ ॥ कोठे मैना रावे गोड असे बोल बोलती कुतुकें,। रम्य प्रकार फारचि, होइल विस्तार, वर्णितां तितुके ॥ ९ ॥ ह्यांतील अनुप्रास, सरलता, व वर्णनशैली ह्यांकडे लक्ष्य दिले हणजे कवीच्या प्रसादगुणाची सहज साक्ष पटते. वीररसाचा आवेशही तसाच स्फूर्तिदायक आहे. पहाः तें वीर स्फुरणाने वदती ते गौरवून दादास । "दादासाहेब चला, सिद्धचि आहों अह्मी सदा दास" ॥१॥ तै राय तोषला बहु, वीरमनोत्साह पूर्ण पाहुनियां । कां न ह्मणेल जन असें "अन्य नसेलचि सुखी नृपाहुनिया" ॥ २ ॥ कटका स्वकट बिकट पथ लंघुनि रघुनाथ शत्रुपर निकट । गेला तिमोरशा तों आला भट घेउनी करूनि कट ॥ ३ ॥ विश्वासरावाच्या पत्नीचे भाषण व त्यावर त्याचे उत्तर ही वीराला फारच शोभण्यासारखी आहेत. त्यांतील दोनचारच आर्याः बोले पिकस्वरा ती, "ही तनु तुमच्या वियोगगिरिखालीं । जाणार चूर होउनी, माझी स्थिति ह्मणुनि हो अशी झाली"॥ १॥ मग राजपुत्र बोले, "प्रिये तुझा हाच का शहाणपणा ? । वदसी काय बरे हे ? जाऊं नये काय मी कधीच रणा ? ॥ २॥ होता आजोबांचा काय पराक्रम, कशी तरी कीर्ती, । यच्चरितश्रवणानें, सामान्यातेंहि येतसे स्फूर्ती ॥ ३ ॥ "प्यावें बळेंच कां तें, ध्याया स्वप्राण जे उणे न गर । युष्मद्वियोगयोगें, होइल मज शून्य हैं पुणे नगर" ॥ ४ ॥ "ते काका, विंचुरकर विठ्ठल शिवदेव, आणि ते शिंदे, । नारोशंकर, आदिक येति यशाचे सदैव पोशिंदे ॥ ५ ॥ कौरव पांडव यांचे युद्ध पुरें ऐकलेच आहे तूं । कर्णादि वीर असतां वृषसेन धरी रणार्थ कां हेतू ॥ ६ ॥