या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१४० केरळकोकिळ, पुस्तक १३ वें. धर्म वृकोदर, माद्रीसुत हे असतांही तो विजयकुमर । अभिमन्यु एकटा तें, बहुतांशी कां बरें करी समर ? ॥ ७॥ तूंच पहा निजचित्ती आणुनि धर्माश्वमेधसमयाला । हंसध्वजादि असतां, वीर सुधन्वा रणास कां आला ?" ॥ ८ ॥ हे अगदी त्रोटक वेंचे आहेत, ह्यावरून हा संवाद किती सरस असेल ह्याची वाचक कल्पना करतीलच; व त्यांस युद्धोत्सुक सुधन्व्याच्या चरित्राचेही स्मरण झाल्यावांचून राहणार नाही. बळवंतराव मेहेंदळ्यांच्या पत्नीचा सहगमनाचा भागही असाच हृदयद्रावक वठला आहे. परंतु विस्तारभयास्तव तें सर्व सोडून देऊन फक्त युद्धांतीलच काही वेंचे व दृष्टांतपर भाग दाखवून देऊन पुर करता. सैन्याचा थाट: हत्ती घोडे गाडे गाड्या वाड्यापुढे बहुत जमती । कमती नसेच कांहीं, प्रेक्षक ती सिद्धता बघुनि रमती ॥ १ ॥ रिपुस महा दर देते, दोन बहादर असे असति त्यांत । ते समशेरबहादर दूसरे राजे बहादर ख्यात ॥ २॥ विठ्ठल शिवदेव तिजे ज्याचें संस्थान होय विंचूर । त्र्यंबक पुरंदरे ते चवथे जे करिति शत्रचा चूर ॥ ६ ॥ सूयोदयी पुण्याच्या बाहेर पडोनि चाललें दळ तें। कमलांतुनि मधुपावलि सुटुनि जशि केतकीकडे वळत ॥ ४ ॥ खालील आर्यात स्वामिभक्ति व उपमाचातुर्य ही दोन्ही दिसून येतात. सबल सदाशिव पाहुनि झाला आनंद त्यांहि सरदारां । स्वाम्याज्ञा आणि समर यांहन न रुचे जयां स्वसुतदारा ॥ १॥ देहचि भाऊ गमले सरदार दहा दशेंद्रियें गमलीं। सेना इतरावयवीं कल्पुनि जनतति विलोकुनी रमली ॥ २ ॥ पध्रा हजार पत्ती, स्वारहि सत्तर हजार तत्संगें। पेंढार फार होतें, गणितां संख्या द्विलक्ष मन गुंगे ॥ ३ ॥ धरणीपासुनि गेले नीट धुळीचे प्रचंड लोट नभीं। वाटे गगनाधार स्तंभततिच काय ही विशाल उभी ॥ ४ ॥ असो. हा विस्तार फारच वाढत जाणार. ह्याकरितां आटपते घेणे भाग आहे. येवढ्यावरून वाचकांस आह्मीं सांगितलेल्या कवीच्या गुणांची पुष्कळ प्रकारे क