या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

अंक ६ वा. जून १८९९. १४१ ल्पना होण्यासारखी आहे. शेवटचा उपसंहाराचा सर्व भाग कवीने श्लोकबद्ध केलेला आहे. यानांची नित्य पाहतां ठेले। ह्यांत 'ठेले' हा शब्द अपरिचित आहे. मनांतचि उभारी । हा छंदोभंग आहे. , काढी पळ वाघाला पळण्याची विदित ती असेच कला। ह्यांत वाघाच्या आंगीं पळण्याची कला असते, असें झटले आहे तें सत्य नव्हे. वाघ हा शूर समजला जातो; व तसाच तुटून पडण्याचा स्वभाव असतो. निजसैनिकांसहि उभारी । आगल हाही छंदोभंग आहे. 'स्त्रीस' 'कामास;' 'रानी' 'करुनी.' अस विजोड यमकही कोठे कोठे आढळतात, पण ही दोषस्थळे इतकी अत्यल्प आहेत, की ह्या एक सहस्र पद्यांमध्ये त्यांची मुळीच गणती करता येत नाही झटले तरी चालेल. वरील सर्व गोष्टी विचारात घेतल्या ह्मणजे प्रस्तुतचे काव्यकर्ते कै. कुळकरणा है आधुनिक कविमंडळांत धुरीणांपैकी आहेत. ह्या आमच्या विधानाची वाचकासही साक्ष पटेलच; व रसिकजन ह्या काव्याचा आस्वाद घेतल्यावांचून राहणार नाहीत अशी आझाला फार आशा आहे. आतां सरतेशेवटी एक सूचना करणे इष्ट दिसते, ती ही की, बडोदें येथे मेसर्स दामोदर सांवळाराम कंपनीने आधुनिक कवींची काव्ये छापण्याचे स्वीकारले आहे, त्यांत प्रस्तुत कवीच्या सर्व कवितांचा संग्रह अवश्यमेव करावा ह्मणजे कंपनी व श्री. विंचूरकर ह्या उभयतांचेही हेतु सफल होतील. इतकें सांगून व श्री. आबासाहेब विंचूरकर ह्यांच्या गुणज्ञतेबद्दल, दीनवात्सल्याबद्दल, रसिकतेबद्दल व थोरपणाबद्दल अभिनंदन करून त्यांच्याप्रमाणेच कवीच्या आत्म्यास परमेश्वर शांति देवो असें सद्गदित अंतःकरणाने हणून हा भाग संपवितों.